यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
ग्रामीण भागातील गरीब व गरजु विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती मिळावी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोहोचता यावे व त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील व प्रवीण महाजन यांच्या युवक मित्र परिवार ग्रुपच्या माध्यमातून वतीने माध्यमिक विद्यालय उमाळे येथील गरजू विद्यार्थ्यांना ५० सायकलींचे वाटप नुकतेच करण्यात आले.सदर सायकल वाटप कार्यक्रम विद्यालयाच्या प्रांगणात जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांच्या हस्ते व जिल्हा बाल कल्याण समिती सदस्य संदीप पाटील (सोनवणे) डांभुर्णी व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
उमाळे येथील विद्यालयात ५० सायकली वाटप करतानाच प्रवीण महाजन यांच्या युवक मित्र परिवारच्या सामाजीक बांधीलकी जोपासणाऱ्या कार्यक्रमांच्या माध्यमातुन गरजू विद्यार्थ्यांना १००० सायकल वाटपाचा टप्पा देखील आज पूर्ण झाला.अश्या स्तुत्य कार्यक्रमात मला प्रमुख अतिथी म्हणून येण्याची व विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी प्रतापराव पाटील यांच्यामुळे लाभली असे प्रवीण महाजन यावेळी म्हणाले.
युवक मित्र परिवार हा कळंबू ता.शहादा जिल्हा नंदुरबार येथील शाळेत शिकलेल्या तसेच खान्देशातील विविध क्षेत्रात यशस्वी करिअर केलेल्या मित्रांचा समूह आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्रतापराव पाटील म्हणाले की,फक्त वही पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे,भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण होय.तसेच मी सुद्धा आपल्यासारख्या सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलो मात्र शिक्षणाची कास धरली आणि गुरुजनांचे,आई वडिलांचे तसेच ज्येष्ठांचे ऐकले,शिस्तप्रिय जीवन जगलो.तुम्हीही शिस्तप्रिय जीवन जगा, मोठ्यांचा आदर करा आपल्याला यश नक्की मिळेल अशी गुरुकिल्ली मा.श्री.प्रतापराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली.या कार्यक्रमाला युवक मित्र परिवाराचे प्रवीण महाजन यांचे प्रतिनिधी म्हणून आरिफ पटेल उपस्थित होते.त्यांनी प्रवीण महाजन यांच्या काळात उमाळे माध्यमिक विद्यालयासाठी प्रयोगशाळा उभारण्यात येईल असे जाहीर केले व मुलांना शुभेच्छा दिल्या.प्रसंगी सरपंच सौ.संगीता खडसे व ग्राम पंचायतीचे सदस्य,उमाळे विकासोचे संचालक,प्रतिष्ठित शेतकरी व नागरिक,उमाळे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश सोनवणे व शिक्षक, पालक तसेच परिसरातील सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.