यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना प्रत्येक संघर्षात साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी त्यागमुर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्त भावपुर्ण अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यानिमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.प्रसंगी सरपंच विलास अडकमोल यांनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवन कार्याविषयी तसेच त्यांनी संघर्ष करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेल्या साथीबाबत मार्गदर्शन केले.यावेळी सरपंच विलास अडकमोल,ग्रामसेवक तिडके,ग्रामपंचायत सदस्य सत्तार तडवी,अफरोज पटेल,अमोल नेहेते,लिपीक किसन तायडे,शिपाई सलिम तडवी,सामाजीक कार्यकर्ते अनिल इंधाटे,नबाब तडवी,भरत चौधरी,विनोद अडकमोल,दत्तात्रय तायडे यांच्यासह बहूसंख्य ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.