Just another WordPress site

सातोद येथे थकीत बिलाच्या मागणीसाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांना मारहाण

पिता पुत्राविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील सातोद येथे महावितरणच्या बिलाची थकबाकी मागणीसाठी वीज कर्मचारी गेले असता त्याचा राग येऊन पिता-पुत्राने विज कर्मचाऱ्यासह सोबतच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे.याबाबत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोघ पिता पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,तालुक्यातील सातोद येथील राहणारे सुनील भास्कर धांडे यांचेकडे मंगळवारी दि.७ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वीज वितरण कंपनीचे थकबाकी असलेले विजबिल मागणीसाठी येथील महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ योगेश प्रल्हाद बारी व सोबतचे कर्मचारी गिरीश सतीश चौधरी हे सुनील धांडे यांचेकडे थकीत विजबिल मागणीसाठी गेले असता व वरिष्ठाच्या आदेशाने त्यांना भरण्यास सांगितले असता त्याचा राग येऊन सुनील धांडे व योगेश सुनील धांडे या दोघांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.याबाबत योगेश बारी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून यावल पोलीस ठाण्यात सदरील पिता-पुत्राविरुद्ध भादंवि  कलम ३५३,३३२,३२३,५०४,५०६,व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर या दोघ पिता पुत्राला पोलिसांनी अटक केली आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.