यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील चिंचोली येथील शिवारात असलेल्या सखुबाई एकनाथ कोळी यांचे शेत गट नंबर २/२ मधील एका खाजगी कंपनीच्या मोबाईल टॉवरमधील जनरेटरमधून सुमारे आठ हजार रुपये किमतीचे डिझेल चोरीस घेल्याची घटना दि.४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान घडली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,तालुकयातील चिंचोली शिवारात असलेल्या सखुबाई एकनाथ कोळी यांच्या गट नं २/२ या ठिकाणी असलेल्या एका खाजगी कंपनीच्या मोबाईल टॉवरच्या बॅटरीमधील १५० लिटर डिझेल दि.४ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारीच्या दरम्यान दुपारी साडेबारा वाजेपर्यंत अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे.याबाबत मोबाईल टावरचे कर्मचारी योगेश गणेश चौधरी यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे आदेशान्वये वरिष्ठ सहायक फौजदार अजिज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस करीत आहेत.