पक्षासोबत गद्दारी करणाऱ्या बंडखोर आमदारांना काय मिळाले,”बाबाजी का ठुल्लू”
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची पाचोरा येथील शिवसंवाद रॅलीत बंडखोरांवर घणाघाती टिका
जळगाव -पोलीस नायक (जिल्हा प्रतिनिधी):-शिवसेनेत बंडखोरी करण्याकरिता तात्पुरते मुख्यमंत्री यांनी बंडखोर आमदारांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले खरे परंतु पक्षासोबत गद्दारी करण्याऱ्या बंडखोर आमदारांना काय मिळाले ? तर “बाबाजी का ठुल्लू”अशी घणाघाती टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पाचोरा येथील शिवसंवाद रॅली दरम्यान केली.जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यापासून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद रॅलीच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात करण्यात आली.पाचोरा येथील शिवसेना माजी आमदार आर.ओ.पाटील यांची कन्या वैशाली सुर्यवंशी यांनी आयोजित केलेल्या सभेप्रसंगी आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान हि जहरी टिका केली.त्याच बरोबर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तात्पुरते मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला.मुख्यमंत्र्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्या ५० आमदारांसोबत दहीहंडी फोडली व आमदारांना मलईही खायला मिळाली परंतु यांनी मात्र जनतेला वाऱ्यावर सोडण्याची कसर सोडली नाही असा आरोपही त्यांनी यावेळी केला.