मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेमन याच्या कबरीच्या विषय सध्या राज्याच्या राजकारणात चांगलाच चर्चिला जात आहे.यात नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होतांना दिसत आहेत.त्यात याकूब मेमन याची कबर फुलांनी सजविण्यात आल्याचा एक फोटो व्हायरल झाल्यामुळे हे प्रकरण जास्तच तापले गेले आहे.सदरील घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असुन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई हि केली जाईल असे सांगितले आहे.त्यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेमन याची कबर फुलांनी सजविण्यात आल्याचा एक फोटो व्हायरल झाल्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले आहे.फोटो व्हायरल झाल्यानंतर भाजपाने शिवसेनेवर थेट टीका केली होती.भाजपा नेते आशिष शेलार यांनी पेंग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम जाहीर करावा असे म्हणून शिवसेनेवर निशाणा साधला होता.त्यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही जोरदार प्रतिउत्तर दिले होते.असे आरोप-प्रत्यारोप चालू असतांनाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस त्यांचे काम करीत आहेत जे काही चुकीचे झाले असेल त्यांच्यावर कारवाई होईल अशी प्रतिक्रिया दिल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.