यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील प्रधानमंत्री फळपिक विमाधारक शेतकऱ्यांनी फळपिक विमा योजनेचा मिळवण्यासाठी विमा कंपनींच्या निकषानुसार तसेच अटी व नियमांचे पालन करून विम्याची प्रक्रीया पुर्ण केली असतांनादेखील मध्येच पुन्हा नव्याने पिकविमा कंपनीमार्फत नव्याने जिओ टॅकींगचे फोटो,भाडे तत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी याबाबत मुळ मालकाचे संमतीपत्र लिहुन दिल्यावर सुद्धा त्याच कागदपत्रांची नव्याने मागणी करण्यात येत असून नविन नविन कारणे दाखवुन तसेच पडताळणी व चौकशीच्या नावाखाली शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे.याकरिता विमा कंपनी विरोधात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करीत तहसीलदार आर.डी.पाटील यांना याबाबत नुकतेच निवेदन देण्यात आले.
सदरील शेतकऱ्यांच्या या मागणीबाबत तात्काळ शासन स्तरावरून विमा कंपनीला योग्य ते शेतकरी हिताचे आदेश देवुन पिक विम्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा याविषयावर शासनाकडुन विचार न झाल्यास शेतकऱ्यांच्या वतीने तिव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा आंदोलकांच्या वतीने देण्यात आला आहे.या आंदोलनात पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील,कॉंग्रेसचे कदीर खान,अनिल जंजाळे,काँग्रेसचे हाजी गफ्फार शाह,नईम शेख,साकळीचे शेतकरी दिपक पाटील,यावलचे नगरसेवक शेख असलम शेख नबी,समिर शेख मोमीन,शेतकरी कोमल पाटील,धिरज कूरकुरे,अमोल पाटील,अमर कोळी,हेमंत पाटील,लोकेश महाजन,वसंत पाटील,तुषार जावळे,वैभव महाजन यांच्यासह शेकडो शेतकरी बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते.