Just another WordPress site

यावल पंचायत समितीचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर;सेवा कार्यकाळ पेक्षाही अधिक काळ होवुन देखील बदल्या नाही ?

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

येथील पंचायत समितीच्या विविध विभागात मागील आठ ते दहा वर्षापासून काही अधिकारी व कर्मचारी हे एकाच ठिकाणी प्रशासकीय सेवेच्या नावाखाली तळ ठोकुन राहात असल्याने यासर्व “सावळ्या  गोंधळाचा” प्रशासकीय कामावर मोठा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसुन येत आहे.यामुळे तालुक्यातील विकास कामांचे बारा वाजले असुन याकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी गांर्भीयाने लक्ष देऊन सेवाकार्याची मर्यादा संपलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की,यावल पंचायत समितीमध्ये द्वितीय श्रेणीतील अधिकारी व तृतीय श्रेणीतील कर्मचारी यातील काही अधिकारी व ग्रामसेवक हे आपले राजकीय व आर्थिक बळ वापरून मागील दहा वर्षापेक्षा अधिक काळापासून यावल पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात तळ ठोकुन राहात असल्याने तालुक्यातील ग्रामीण पातळीवरील विकास कामांचा खेळखंडोबा होवु लागला आहे.यात काही अधिकारी तर निव्वळ हजेरी मास्तर झाल्याचे दिसुन येत आहे.यावल पंचायत समितीमध्ये एकाच ठीकाणी वर्षानुवर्ष प्रशासकीय सेवेचे सर्व नियम धाब्यावर ठेऊन  असे हे अधिकारी व ग्रामसेवक कसे राहु शकतात?असा प्रश्न ग्रामीण पातळीवर ग्रामस्थांमध्ये उपस्थित केला जात आहे.जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी व यावल गटविकास अधिकारी यांनी याबाबत तात्काळ निर्णय घेवुन सेवा कार्यपेक्षाही अधिक काळापासुन पंचायत समितीच्या अंतर्गत कार्यरत असलेल्यांची तात्काळ उचलबांगडी करावी अशी मागणी तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.