भाजपाचे महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता मिळविण्याचे उद्दिष्ट असून १२२ पर्यंतचा टप्पा २०१४ मध्ये गाठला होता.भाजपाने युतीत २०० जागा मिळविण्याचे उद्दिष्ट जाहीर केले असले तरी भाजपाला १३०-१४० जागा मिळतील असे नियोजन करण्यात येत आहे.अपक्ष व इतरांच्या मदतीने भाजपाला स्वबळावर सत्ता मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली की बाळासाहेबांच्या शिवसेनेला सत्तावाटपात फारसा अधिकार उरणार नाही. त्यामुळे सध्या शिंदे गटात असलेले ४० आमदारही पुन्हा निवडून येण्याची शक्यता नाही व ही संख्या कमी होणे भाजपच्या पथ्थ्यावर पडणार आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथील प्रदेश कार्यकारिणीत बोलताना ‘शत प्रतिशत भाजपा’च्या घोषणेचा जुना संदर्भ आपल्या भाषणात दिला असल्याने तो बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी पुरेसा सूचक असल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे भाजपा श्रेष्ठींशी सध्या चांगले संबंध असल्याने तेच २०२४ नंतर पुढील पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी राहतील व फडणवीस यांना लवकरच केंद्रात पाठविले जाईल अशी राजकीय चर्चा चर्चिल्या जात आहेत.भाजपने जर ३० वर्षे युतीत राहिलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची शकले केली तेव्हा शिंदे यांचीही ताकद २०२४ नंतर फार वाढणार नाही उलट कमी होईल याची काळजी भाजपाकडून घेतली जाण्याची शक्यता आहे.त्यासाठीच भाजपने लोकसभेच्या ४८ व विधानसभेच्या २८८ मतदारसंघात तयारी सुरू केली असून मतदान केंद्र निहाय कार्यकर्त्यांवर जबाबदाऱ्या देण्यात येत आहेत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चांगले संबंध असलेल्या व फडणवीस यांचे विश्वासू,माजी संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांच्याकडे लोकसभा व विधानसभा निवडणुकीची पूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.भाजपा युतीची भाषा बोलत असला तरी कमळ चिन्हावर अधिकाधिक उमेदवार निवडून आणून स्वबळावर सत्ता मिळविण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे त्यामुळे भाजपाचे महाविजय संकल्प २०२४ अभियान हा बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी सूचक इशारा असून त्यांना भविष्यात आपले महत्व टिकवून ठेवण्यासाठी व राजकीय भवितव्यासाठी झगडावे लागणार आहे एव्हडे मात्र निश्चित !
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
भाजपाच्या वतीने ‘महाविजय संकल्प अभियान २०२४” जाहीर करण्यात आलेले आहे यात लोकसभेसाठी ४२ तर विधानसभेसाठी २०० जागांचे लक्ष्य निश्चित करण्यात आहे.भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युतीत लढून हा विजय संपादन करतील असे जाहीर करण्यात आले असले तरी भाजपाचे बाहू स्वबळावर सत्ता काबीज करण्यासाठी फुरफुरत आहेत हा बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी धोक्याचा इशाराच असल्याचे मानले जात आहे.भाजपा व शिवसेनेने महाराष्ट्रात २०१४ च्या विधानसभा निवडणुकांचा अपवाद वगळता ३० वर्षे युतीच्या माध्यमातून निवडणुका लढविल्या आहेत.विधानसभा जागावाटपाचा विचार करता शिवसेना सुरुवातीला १७१ व भाजपा ११७ व लोकसभेसाठी भाजपा २६ व शिवसेना २२ जागा लढवीत होते मात्र शिवसेनेच्या विधानसभेच्या जागा युतीच्या जागा वाटपात कमी होऊन २०१९ मध्ये १२६ पर्यंत करण्यात आलेल्या आहेत.युती तुटली तेव्हा भाजपाला विधानसभेत १२२ तर २०१९ मध्ये युतीत लढल्यावर १०५ जागा मिळवता आल्या होत्या.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा व बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सरकार राज्यात सत्तेवर असले तरी वरचष्मा भाजपाचाच आहे. केंद्रातील सत्तेमध्ये शिंदे गटाला अद्याप वाटा मिळालेला नाही तसेच भाजपा व शिवसेनेची युती असतानाही निवडणुकांमध्ये एकमेकांचे उमेदवार पाडले गेल्याचे आरोप झाले व भाजपाने उद्धव ठाकरे यांचे खच्चीकरणही केले.शिंदे यांच्याकडे सध्या ४० आमदार व १३ खासदार असून मात्र अद्याप भाजपा व शिंदे गटाचे जागावाटप जाहीर झालेले नाही.शिंदे गटाला लोकसभेसाठी १३-१४ व विधानसभेसाठी ६०-७० जागांहून अधिक जागा भाजपाकडून जागावाटपात मिळण्याची शक्यता नाही त्यामुळे भाजप लोकसभेसाठी ३४ व विधानसभेसाठी २०० हून अधिक जागा लढविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.