दिलीप गणोरकर
अमरावती जिल्हा प्रमुख
अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी ‘लिव्ह इन रिलेशनबाबत नुकतेच मोठे विधान केले आहे.नवनीत राणा म्हणतात की,मी माझ्या संपूर्ण जीवनात कधीही’लिव्ह इन रिलेशन’बाबत ऐकले नव्हते मात्र आजच्या पिढीकडून हे सगळे ऐकले जात आहे.आई-वडील आपल्या मुलांना शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात पाठवतात परंतु तिथे मुली भाड्याच्या घरात मुलांसोबत ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहतात अशी आजची वस्तुस्थिती निर्माण झाली असल्याचे आपणास सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे असे खा.नवनीत राणा यांनी अमरावती येथील एका कार्यक्रमात बोलतांना म्हटले आहे.यापुढे नवनीत राणा म्हणाल्या की,“मीही याच पिढीची आहे.परंतु ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ काय असते? हे मी माझ्या जीवनात कधीही ऐकलेले नाही परंतु आजच्या पिढीकडून ऐकले जातेय की,आई-वडील आपल्या मुलांना शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात पाठवतात परंतु तिथे मुली भाड्याच्या घरात मुलांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असतात.मुले मुलांबरोबर लग्न करतात व मुली मुलींबरोबर लग्न करत आहेत!ही कुठली परंपरा व संस्कृती आपल्या जीवनात आली?अशा आजच्या या असंस्कृत जीवनशैलीविषयी नाराजी व्यक्त केली.
खा.नवनीत राणा पुढे म्हणाल्या की,“मी इन्स्टाग्राम व विविध सोशल मीडियावर हे विदारक चित्र पाहत असते यामुळे माझे मन खिन्न होते तसेच माझ्या मनात कुठेना कुठे तरी दु:ख होत आहे.त्यामुळे अशी संस्कृतिहीन परिस्थिती आजच्या घडीला आपल्या तरुण तरुणींमध्ये ही गोष्ट नेमकी कुठून आली?असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.आपण स्वावलंबी झालो आहोत व आपल्याला स्वावलंबी करण्यासाठी आपल्या आई-वडिलांनी रक्ताचे पाणी केलेले आहे व त्यांच्या मेहनतीतूनच आपण या पदापर्यंत पोहोचलो आहोत.थोडेफार पैसे कमवायलो लागलो म्हणून असे संस्कृतिहीन परिस्थिती वागायचे ?… ही आपली संस्कृती नाही.आई-वडिलांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले असून आता आपणही आपल्या आईवडिलांसाठी व समाजासाठी काहीतरी केले पाहिजे.आपल्याला देवाने प्रत्येकाला काही ना काही तरी करायला पाठविलेले आहे,”याची जण प्रत्येकाने ठेवली पाहिजे असेही नवनीत राणा म्हणाल्या.त्याचबरोबर ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहणे हि कुठली संस्कृती?असा सवाल खा.नवनीत राणा यांनी तरुणपिढीला विचारला आहे.