यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील यावल बस स्थानकासमोरील मुख्य मार्गावर असलेल्या सार्वजनिक ठीकाणी अल्पवयीन मुलगी शाळेत जात असतांना तिचा पाठलाग करून तिची छेडछाड करून “तुझा मोबाईल क्रमांक दे”असे सांगुन तिचा विनयभंग केल्या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात त्या तरूणा विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत तरूणाकडून झालेला प्रकार मुलीने आपल्या आई-वडील यांना सांगितला असता आई-वडिलांनी या मुलाला गाठुन जाब विचारले असता त्या तरूणाने मुलीच्या वडिलांशी धक्काबुक्की करून त्याच्या जवळची मोटरसायकल जागेवरच सोडुन पलायन केले आहे.
याबाबत मिळालेली माहीती अशी की,यावल बसस्थानकासमोरील मार्गाकडून शाळेमध्ये जाणारी पंधरा वर्षीय विद्यार्थिनी दि.१६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते १,३० वाजेच्या सुमारास आपल्या घरी जात असतांना शहरातील बसस्थानक परिसरातील मुख्य मार्गावरील संशयीत आरोपी आनंद बिऱ्हाडे याने मुलीला तिचा मोबाइल क्रमांक मागुन छेडखानी केली असून सदरच्या या छेडखानीच्या गुन्ह्यातील फरार झालेल्या संशयीताचे नाव आनंद बिऱ्हाडे असे असल्याचे समजते.यासंदर्भात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनमध्ये भादवी कलम ३५४ 3५४ (ड) ३२३ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम ७/८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरुडे व पोलीस कर्मचारी करीत आहेत.संशयीत आरोपी आनंद बिऱ्हाडे यांचा पोलीस शोध घेत आहेत.