Just another WordPress site

“निवडणूक आयोगाने शेण खाल्ले आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार !”

शिवसेना पक्षाचे नाव व निशाणीबाबत आयोगाने दिलेला निकालाबाबत उद्धव ठाकरेंची खरमरीत टीका

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

चोरीला राजमान्यता दिली तरी चोर हा चोरच,निवडणूक आयोगाने शेण खाल्ले आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार ही तर बेबंदशाही, लोकशाहीला श्रद्धांजली वाहण्याची वेळ आलीय,शिवसेना संपणार नाही,शिवसेना लेचीपेची नाही.शिवसैनिकांनो आणि शिवसेना प्रेमींनो,खचू नका.ही लढाई शेवटपर्यंत लढावीच लागेल.विजय आपलाच आहे.फक्त हिंमत सोडू नका.जिद्द खचू देऊ नका.मैदानात उतरलोय.आता विजयाशिवाय माघारी परतायचे नाही !केंद्रीय निवडणूक आयोगाने शेण खाल्ले आहे.शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण निशाणीबाबत आयोगाने दिलेला निकाल लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे अशी तोफ डागतानाच या निर्णया विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.चोरीला राजमान्यता दिली तरी चोर हा चोरच असतो.ही चोरी पचणार नाही असे ठणकावत उद्धव ठाकरे यांनी लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या भाजपला ललकारले आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाची उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन चिरफाड केली.लोकशाहीला श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली आहे असे नमूद करत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे.

पंतप्रधानांनी लालकिल्ल्यावरून घोषणा करायला हवी की,७५ वर्षांचे स्वातंत्र्य संपुष्टात आलेले आहे आणि लोकशाही संपवून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात केली आहे असे नमूद करत उद्धव ठाकरे यांनी हल्ला चढवला आहे.धनुष्यबाण चिन्ह ओरबाडून घेण्याचा प्रयत्न केला तरी ते घेता येणार नाही. कारण शिवसेनेचे धनुष्यबाण शिवसेना प्रमुखांच्या पूजेतील आहे.आता तिकडे जल्लोष सुरू असेल आपली चोरी पचली म्हणून चोरांना आनंद झाला असेल पण शेवटी चोर तो चोरच असतो.ज्याच्यामध्ये स्वतः काही करण्याची मर्दानगी नसते तो नामर्दच असतो.नामर्द किती जरी मातला तरी तो मर्द होऊ शकत नाही हेच सत्य आहे असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले.निवडणूक आयोगाने गद्दारांना धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना दिली आहे.याचा अर्थ येत्या महिना-दोन महिन्यांत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागू शकते त्यांना आता कोणत्याही परिस्थितीत मुंबई पालिका जिंकायची आहे.मुंबईच्या हातात भीकेचा कटोरा देऊन दिल्लीश्वरांच्या दारात उभी करायचे आहे.हे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच आयोगाने त्यांना धनुष्यबाण दिला असेल.उद्या कदाचित आमचे मशाल हे चिन्हदेखील हिसकावून घेतले जाऊ शकते पण मशाल आता पेटली आहे.यंत्रणांचा वापर करून जेवढा अन्याय कराल त्या सगळ्याचा बदला सामान्य जनता घेतल्याशिवाय राहणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले आहे.
…हा ठरवून केलेला कट
उद्धव ठाकरे यांनी यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.ते म्हणाले की,
‘धनुष्यबाण शिंदे गटाला मिळणार.ब्रेकींग न्यूज घ्या’.असे केंद्रीय लघूसुक्ष्म मंत्र्यांनी माध्यमांना सांगितले होते.उपमुख्यमंत्रीही म्हणाले
होते की,धनुष्यबाण शिंदे गटालाच मिळणार.हा ठरवलेला कट आहे का?कटकारस्थान होतेच आहे,पण कटात केवढय़ा पातळीवरचे
लोक सामील झाले हेसुद्धा आता महाराष्ट्रातील जनतेला समजले.’असे सांगतानाच धनुष्यबाण ओरबाडून घेता येणार नाही असेही
उद्धव ठाकरे यांनी बजावले.
…तशी निवडणूक आयुक्तांची नेमणूक व्हावी
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रशांत भूषण यांच्या खटल्याचा दाखला यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.ते म्हणाले की,‘भूषण
यांनी निवडणूक आयुक्तांबद्दलच शंका उपस्थित केली आहे.चोवीस तासांत फाईल हलली कशी आणि आयुक्तांची नेमणूक झालीच
कशी? असे भूषण यांनी म्हटले आहे त्यामुळे आता असे वाटायला लागलेय की न्यायाधीश नेमण्याची प्रक्रिया असते तशीच निवडणूक
आयुक्त नेमण्यासाठी विरोधी पक्षाला सोबत घेऊन राबवण्याची गरज आहे.मिंध्यांना बाळासाहेबांचे विचार कळलेच नाहीत भाजपने  शिवसेनेच्या पाठीत वार केले म्हणून आम्ही कॉंग्रससोबत गेलो तर हिंदुत्व सोडले असे होत नाही.बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांना कधी कळलेच नाहीत.गुलाम व्हा असे ते कधीच म्हणाले नाहीत अन्यायाशी लढा असे ते म्हणाले होते.
सर्वोच्च न्यायालयात जाणार !
आम्हाला खात्री आहे की,सर्वोच्च न्यायालयात याचा निकाल लागेल.दुसरी बाब म्हणजे अपात्रतेची केस सुरू आहे.जर घटना मानून
निर्णय लागला तर तो काय लागेल? सोळा जण अपात्र होणार म्हणजे होणारच असे घटना तज्ञांचे मत आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.
धनुष्यबाण रावणाकडे आणि रामाकडेही होता.शेवटी विजय हा रामाचाच झाला आणि शंभर कौरव एकत्र आले तरी पांडव हरले
नव्हते.नेहमी सत्याचाच विजय होतो.शिवसेनेवर झालेला हा अन्याय अनेकांना मान्य नाही.पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून घोषणा करायला हरकत नाही की,७५ वर्षांचे स्वातंत्र्य आता संपले आहे आणि देशातील लोकशाही संपवून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात केलेली आहे.पक्ष कुणाच्या बरोबर आहे हे केवळ निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या आकडय़ांवरून ठरवायला लागलो तर मात्र कोणीही धनाढय़ माणूस निवडून आलेले आमदार,खासदार विकत घेऊन पक्षाचा सर्वेसर्वा बनू शकतो.यांना कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची आहे.मुंबईच्या हातात भिकेचा कटोरा देऊन मुंबईला दिल्लीश्वरांच्या दारात उभी करायची आहे.हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे,अंध धृतराष्ट्राचा नाही.महाराष्ट्र आपल्या डोळय़ासमोर लोकशाहीचे असे वस्त्रहरण कदापि खपवून घेणार नाही!शिवसेना प्रमुखांच्या देव्हाऱ्यातील धनुष्यबाण आपले तेज दाखवेल.मिंध्यांनी आजच्यापुरता चोरलेला धनुष्यबाण हा कागदावरचा आहे.खरा धनुष्यबाण मात्र माझ्याकडे आहे असे सांगत उद्धव ठाकरे
यांनी यावेळी शिवसेना प्रमुखांनी देव्हाऱ्यात पुजलेला धनुष्यबाण प्रसारमाध्यमांना दाखवला.ते म्हणाले की,अनेकांना वाटले असेल की
शिवसेना आता संपली पण शिवसेना इतकी लेचीपेची नाही.शिवसेना प्रमुखांनी स्वतःच्या हाताने हा धनुष्यबाण पुजला त्याच्यावर
पुंकूदेखील आहे.अजूनही आमच्या देव्हाऱ्यात तो आहे.तो पूजेतला आणि पूजेतच राहणार.तो धनुष्यबाण कुणी हिरावून घेऊ शकत
नाही.बाळासाहेबांनी स्वतःच्या हाताने पुजलेला हा धनुष्यबाण त्याचे तेज आणि शक्ती दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा
उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
निवडणूक आयुक्तांनी थोतांड केले
उद्धव ठाकरे म्हणाले,निवडणूक आयुक्तांनी थोतांड केले.लेखी युक्तिवाद,पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे,सदस्यांचे अर्ज त्यांनी मागितले.ते लाखांच्या संख्येने दिले.आयोगाने मागितले त्या फॉरमॅटमध्ये दिले.आयोगाला जर शेणच खायचे होते आणि आम्हाला शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह द्यायचेच नव्हते तर खटाटोप कशाला करायला लावायचा ?’
तोपर्यंत त्यांना पेढे खाऊ द्या …
आम्ही लवकरच सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत तोपर्यंत त्यांना धनुष्यबाणाचे पेढे खाऊ द्या.धनुष्यबाण चोरल्याचा त्यांना आनंद
मिळू द्या.शेवटी चोर बाजारालाच जर मान्यता मिळणार असेल तर बाकीच्या बाजाराला अर्थ राहत नाही असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.महाराष्ट्रात ‘मोदी ’ हे नाव चालत नाही महाराष्ट्रात मोदीना व चालतनाही हे भाजपला कळले म्हणून त्यांना शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्हाची गरज भासली असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.विरोधी पक्षच नव्हे,तर ज्यांना या देशात लोकशाही टिकावी असे वाटते त्या सर्वांनी एकत्र यायला हवे असे आवाहनही त्यांनी केले.आता पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली,आता मशाल पेटली आहे.प्रत्येक अन्यायाचा बदला महाराष्ट्रातील जनता घेतल्याशिवाय राहणार नाही.माझा धर्म,माझा पक्ष‘माझा धर्म हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे! माझा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे!’असे घोषवाक्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.‘नाव आणि चिन्ह मिळेल,पण ते खांद्यावर वाहून नेणारा प्रामाणिक शिवसैनिक मिळणार नाही अशा पोस्टही झळकल्या आहेत.
धनुष्यबाण पेलायला सुद्धा रामाची हिम्मत लागते–संजय राऊत
धनुष्यबाण पेलायला सुद्धा रामाची हिम्मत लागते नाहीतर रावणसुद्धा धनुष्य उचलायला गेला होता पण ते त्याच्या छाताडावर पडले हा
इतिहास भाजप आणि त्याने निर्माण केलेल्या मिंधे गटाने लक्षात घ्यावे असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी लगावला
आहे.हा धनुष्यबाण शिवसेना प्रमुखांनी निर्माण केलेला आहे.एका हातात मशाल असेलच पण हा धनुष्यबाण कोणाच्या मालकीचा
होऊ शकत नाही.तो पुन्हा आमच्याकडे येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
या निकालाने फारसा फरक पडणार नाही-शरद पवार
निवडणूक आयोगाने शिवसेना व धनुष्यबाणासंबंधी दिलेल्या निकालावर चर्चा करता येणार नाही.या निकालाने फारसा फरक पडेल
असेही वाटत नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.फार तर महिना-पंधरा दिवस चर्चा होईल.अशा ने
पक्ष काही संपत नसतो असे सांगतानाच पवार म्हणाले,काँग्रेसमध्ये एकदा असाच वाद झाला होता.त्यावेळी काँग्रेसची बैलजोडी ही
खूण होती.त्यानंतर काँग्रेसने पंजा हे चिन्ह घेतले त्यामुळे काँग्रेसला काही फरक पडला नाही.लोकांनी ते स्वीकारले त्यामुळे आताही
फरक पडणार नाही.
शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत–अजित पवार
मंगळवारपासून सुनावणी होणार असे सर्वोच्य न्यायालयाने सांगितले असताना निवडणूक आयोगाने एवढी घाई का केली हे कळायला
मार्ग नाही.ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले पण शिवसैनिक उद्धव ठा करे यांच्याच पाठीशी उभा
राहील आणि त्यांच्या विचारांचेच उमेदवार निवडून येतील.
देश कायद्याने की महाशक्तीच्या मर्जीने चालणार?-नाना पटोले
एकनाथ शिंदे ज्या महाशक्तीच्या जिवावर पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळेल असे सांगत होते ते त्यामुळे देश कायद्याने चालणार की
महाशक्तीच्या मर्जीने?ठाकरेंच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह तुम्ही चोरू शकता,पण त्यांना असणारा जनतेचा आशीर्वाद कसा काढून
घेणार?
विश्वास ठेवायचा तरी कोणावर?-सुप्रिया सुळे
विश्वास तरी कोणावर ठेवायचा काही कळत नाही.निवडणूक आयोग पारदर्शक आहे.हा निर्णय कसा झाला?शिवसेनेची स्थापना
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली.माझ्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना पाहतील असे शिवसेना प्रमुखांनी सांगितले होते.
त्यामुळे हा निर्णय धक्कादायक आहे.
शिवसेनेला ठाकरेंपासून वेगळं कसं करणार?-बाळासाहेब थोरात
शिवसेनेला ठाकरेंपासून कोणीच वेगळे करू शकत ना ही.शिवसेना आणि ठाकरे हे वेगळे समीकरण आहे.निवडणूक आयोगाने हा
निर्णय दिला असला तरी राज्यातील जनता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्णय देईल.निवडणूक आयोगाने एकतर्फी निर्णय दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.