यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील नगरपरिषदला कायमस्वरूपी मुख्यधिकारी नसल्याकारणाने शहरातील नागरीकांच्या विविध समस्या व विकासकामांचा खेळखंडोबा झालेला आहे.याबाबत यावल नगरपरिषदला तात्काळ मुख्याधिकाऱ्याची नेमणुक व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत यावल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यावल नगरपरिषदेचा कार्यभार मागील काही दिवसापासुन चोपडा नगरपरिषदचे मुख्यधिकारी यांच्याकडे देण्यात आलेला आहे.शहरातील लोकसंख्याची व्याप्ती पाहता प्रभारी कारभारामुळे नागरीकांच्या मुलभुत समस्याकडे प्रशासनाचे पुर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने शहरवासीयांमध्ये प्रशासकीय कारभारामुळे प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.यावल शहर नगरपरिषदच्या कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा,स्वच्छता, आरोग्य व रस्त्यांसह गटारीच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने शहराच्या सर्वांगीण विकास करणेसाठी नगरसेवक नसल्याने संपुर्ण यंत्रणा ही प्रशासकाच्या अंतर्गत चालणाऱ्या कारभारावर अवलंबुन आहे अशा परिस्थितीत तात्काळ यावल नगर परिषदला कायमस्वरूपी मुख्याधिकारी यांची नेमणुक झाल्यास नागरी समस्यांचे निराकरण होवुन विकास कामांना गती मिळेल.परंतु शासनाच्या वतीने तात्काळ मुख्याधिकारी न मिळाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.यावेळी यावलचे निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांना देण्यात आलेल्या निवेदनावर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले,राष्ट्रवादी काँग्रेस महीला आघाडीच्या सौ.प्रतिभा निळ,यावल शहराध्यक्ष सौ निलीमा धांडे,मोहसीन खान,अरूण लोखंडे,बापु जासुद,हाजी फारूक शेख,अनिकेत तडवी, एजाज मन्यार,कामराज घारू,गुणवंत निळ,आरीफ खान,ईरफान खान यांच्यासह अन्य पक्ष पदाधिकारी यांच्या स्वाक्षरी आहेत.