मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-आज दि.११रोजी माटुंगा-मुलुंड आणि पनवेल-वाशी या रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.ब्लॉक कालावधीत काही लोकल रेल्वेच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही लोकलच्या फेऱ्या विलंबाने होणार आहे.मात्र पश्चिम रेल्वेवर ब्लॉक राहणार नसल्याचे मध्य रेल्वेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान उप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते ४.०५ या कालावधीत ब्लॉक असणार आहे त्यामुळे या ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.शिव,कुर्ला,घाटकोपर,विक्रोळी,भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर ट्रेन थांबणार असून लोकल २० मिनिटे उशिराने धावणार असल्याने त्याचा फरक रेल्वे विलंबाने धावण्यावर होणार आहे.हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल आणि वाशी दरम्यान उप व डाऊन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ या कालावधीत मेगाब्लॉक आहे.परिणामी या काळात पनवेल-बेलापूर ते शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.ठाणे-वाशी-नेरुळ आणि बेलापूर-नेरुळ -खारकोपर मार्गावर लोकल सेवा सुरु राहणार आहे. असे मध्य रेल्वेने कळविले आहे.