Just another WordPress site

शिरपूर पोलिसांकडून १२ तलवारी व प्राणघातक हत्यारांसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

धुळे-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्यावर पोलिसांनी वाहनासह १२ तलवारींसह इतर प्राणघातक हत्यारे असा सहा लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.याप्रकरणी ११ संशयितांविरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे शिरपूर पोलीस सूत्रांकडून कळविण्यात आलेले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशा की,शिरपूर पोलीस ठाण्याचे संदीप शिंदे यांनी याबाबत दिलेल्या तक्रारीनुसार मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या हाडाखेड तपासणी नाक्यावर संशयास्पद वाहनाची तपासणी केली असता वाहनात १२ तलवारी,दोन गुप्त्या,चॉपर, चाकू,दोन लोखंडी फायटर अशी प्राणघातक हत्यारे आढळून आली.सदरील प्राणघातक हत्यारे हि बेकायदेशीरपणे बाळगून त्यांची बेकायदेशीर वाहतूक करण्यात येत होती.त्यानुसार पोलिसांनी वाहनासह सर्व शस्त्रे जप्त केलेली आहेत.सदरी बेकायदेशीर हत्यारांची किंमत सहा लाख २९ हजार रुपये आहे.या प्रकरणी सतपाल सोनवणे,किरण धुळेकर,विकास ठाकरे,सखाराम पवार,सचिन सोनवणे,राजू पवार, विशाल ठाकरे,संतोष पाटील,अमोल चव्हाण,विठ्ठल सोनवणे(सर्व संशयित धुळे तालुक्यातील लळींग,जुन्नर या भागातील रहिवासी आहेत.)या सर्वांविरुद्ध मुंबई आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.शिरपूर पोलिसांनी केलेल्या या स्तुत्य कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी शिरपूर पोलिसांना १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.