Just another WordPress site

अंजाळे येथील कोतवालास वाळूमाफीयांकडून तलाठी कार्यालयातच बेदम मारहाण

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील अंजाळे येथील कोतवाल यांच्या सह दोन जणांना वाळु माफियांकडून तलाठी कार्यालयातच घुसून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.याबाबत वाळू माफियांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी या आशयाचे मागण्यांचे निवेदन यावल तालुका तलाठी व कोतवाल संघटनेच्या वतीने पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांना नुकतेच देण्यात आले आहे.सदरील घटनेमुळे महसुल प्रशासनातर्फे संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहीती अशी की,तालुक्यातील अंजाळे येथे कोतवाल म्हणुन कार्यरत असलेले ओंकार लिलाधर सपकाळे हे दि. २५ फेबुवारी रोजी दुपारी २.३० वाजता तलाठी कार्यालयात शासकीय कामकाज करीत असतांना ९ ते १० वाळु माफीया यांनी कार्यालयात घुसून अंजाळे येथील ओंकार सपकाळे यांना आमच्या विरुद्ध तक्रार का दिली?असा जाब विचारत त्यांना लाकडी दांड्यानी बेदम मारहाण करीत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला.याबाबत यावल तालुका तलाठी व कोतवाल संघटनेच्या वतीने प्रशांत सरोदे,व्ही एस आढाळे,पि एम तावडे,विजय साळवे,निनेश आर गायकवाड,व्ही एल सोळंके यांच्या स्वाक्षरीचे निवेदन पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांना नुकतेच देण्यात आले.सदरील मुजोर झालेल्या वाळु माफिया विरूद्ध तात्काळ कार्यवाही व्हावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीती पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.