यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील यावल-भुसावळ मार्गावरील अंजाळे घाटाजवळ दि.२७ रोजी रात्री झालेल्या एका तरूणाची रस्तालुटी केल्याच्या प्रकरणात पोलीसांनी अटक केलेल्या दोन संशयीत आरोपींना न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की,यावल-भुसावळ मार्गावरील अंजाळे घाटाजवळच्या रस्त्यावर दि.२७ रोजी रात्री सुमारे १o वाजेच्या सुमारास भुसावळकडून यावलकडे आपल्या मोटर सायकलव्दारे येत असतांना अजय रमाकांत मोरे या तरूणाचा चार अज्ञात चोरट्यांनी रस्ता अडवुन मारहाण करीत पिस्तुलचा धाक दाखवुन त्यांच्या ताब्यातील शाईन कंपनीची मोटरसायकल व मोबाइल घेवुन पसार झाले होते.दरम्यान यावलचे पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे,सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान पठान व पोलीस यांच्या पथकांने आरोपीचे शोधकार्य हे वेगाने व योग्य दिशेने केल्याने या रस्तालुट गुन्ह्यातिल संशयीत आरोपी करण रमेश पवार व विक्की अंकुश साळवे यांना अटक करण्यात यश मिळाले होते.सदरील दोघ आरोपींना दि.२८ रोजी यावल न्यायालयात हजर केले असता न्यायाधिश एस एम बनचरे यांनी दोघ संशयीत आरोपींना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.