यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने पंचायत समितीच्या कर्मचारी व अधिकारी वर्ग यांच्या वतीने आज दि.१ मार्च रोजी वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छापर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कौटुंबिक वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात डॉ.मंजुश्री गायकवाड सदरील कौटुंबीक सोहळ्याने कमालीच्या आनंदित झाल्याचे दिसून आले.
यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामसेवक संघटना यांनी एकत्र येत आज दि.१ मार्च रोजी सत्काराचा कौटुंबीक कार्यक्रम आयोजीत केला होता. आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधुन आपल्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांनी प्रसंगी कमालीचा आनंद वयात केला.पंचायत समिती सभागृहात आयोजीत सदरील वाढदिवस सत्कार सोहळा यशस्वीतेकरिता यावल तालुका ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष रुबाब तडवी,तालुका सचिव पि.व्ही.तळेले,सहसचिव हितु महाजन,ग्रामसेवक राजु तडवी,पंचायत समितीचे कक्ष अधिकारी गजानन रिंधे,सरवर तडवी,गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके,पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे,बांधकाम अभियंता आर.पी.तायडे,महिला कर्मचारी सुनिता सोनवणे,फुलवंती भादले,भारती चौधरी,अंजली लोहारे,हेमराज सनांशे,मिलींद कुरकुरे,जाविद तडवी,रौनक तडवी यांच्यासह पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामसेवक संघटना पदाधिकारी यांनी सहभाग नोंदविला.