कर्तव्यात अकार्यक्षम ठरल्याबद्दल वरिष्ट अधिकाऱ्यासह तीन जण निलंबित
सागवान वृक्षांची तोड थांबविण्यास अकार्यक्षम ठरल्याचा तिघांवर ठपका
यावल-पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :-येथील वन विभागात विविध पदांवर कार्यरत असलेल्या तीन वन कर्मचाऱ्यांवर सातपुडा वाघझिरा वनक्षेत्रात मौल्यवान सागवान वृक्षांची वृक्षतोड थांबविण्यास अकार्यक्षम ठरल्याप्रकरणी निलंबित करण्यात आल्याने कर्मचाऱ्यां मध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबतीत माहिती अशी की,यावल पश्चिम वनविभागातील सातपुडा जंगलाच्या वाघझिरा परिमंडळात गेल्या काही दिवसापासून मौल्यवान सागवान वृक्षांसह इतर वृक्षांची वृक्षतोड रोखण्यास अकार्यक्षम ठरल्याच्या कारणावरून येथील कार्यरत वाघझिरा बीटचे वनपाल राजेश शिंदे,वनरक्षक डी.वाय.नलावडे व वनमजुर काशिनाथ बेलदार या तीन जणांना तडकाफडकी निलंबन करण्याची कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती पश्चिम वनक्षेत्राचे वनपरीक्षेत्रपाल एस.टी.भिलावे यांनी दिली आहे.सदरील कार्यवाहीमुळे वन कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.