मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १५०० रुपये वाढ तसेच अंगणवाडी सेविकांसाठी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले आहे.विधानभवनात अंगणवाडी सेविका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले आहे त्यामुळे सदरील अंगणवाडी सेविकांचा संप मागे घेतल्याची घोषणा अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी तसेच अंगणवाडी सेविकांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांनी २० फेब्रुवारी पासून बेमुदत संप पुकारला होता.या बंद कालावधीत अंगणवाड्या बंद असल्याने सहा वर्षापर्यंतची बालके पोषण आहारापासून वंचीत राहत होती.सोबतच गर्भवती मातांची तपासणी,बालकांचे लसीकरण,कुपोषण निर्मूलन आदी कार्यक्रमावरही संपाचा प्रतिकूल परिणाम होत होता.हि बाब लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी संघटनेच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलाविले होते.या बैठकीत मानधन वाढीस पेन्शन योजना व इतर मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.अखेर मुख्यमंत्र्यांनी यास सकारात्मक प्रतिसाद देत राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १५०० रुपये वाढ तसेच अंगणवाडी सेविकांसाठी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले आहे.त्यामुळे अंगणवाडी सेविकांचा संप मागे घेण्यात आला असल्याची घोषणा अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.