यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोणगाव येथील ग्रामपंचायत सरपंचपदी शांताराम पाटील व उपसरपंचपदी मनोहर भालेराव यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.डोणगाव ग्रामपंचायतच्या अडीच वर्षापुर्वीच्या सार्वत्रिक निवडणूकीनंतर सरपंच म्हणून आशाबाई सुरेश पाटील तर उप सरपंचपदी मनोहर पाडुरंग भालेराव यांची निवड करण्यात आली होती.पुढील अडीच वर्षांच्या उर्वरीत कार्यकाळासाठी सरपंचपदी शांताराम अरूण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली असुन विद्यमान उपसरपंचपदी मनोहर पांडुरंग भालेराव यांच्याकडे पुनश्च उपसरपंचपदाची धुरा कायम राखण्यात आली आहे.
यावेळी नवनिर्वाचीत सरपंच शांताराम पाटील यांचा ग्रामपंचायत सभागृहात शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी माजी सरपंच आशाबाई सुरेश पाटील,विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन साहेबराव पाटील,व्हाइस चेअरमन गणेश पाटील,शंकर मगरे,भगवान पाटील,दिवाकर पाटील,विनोद भालेराव,पोलिस पाटील उमेश पाटील,उपसरपंच मनोहर पाडुरंग भालेराव,ग्राम पंचायत सदस्य सुर्यभान पाटील,माधुरी कोळी,सरलाबाई पाटील,भावना ठोके,सामाजीक कार्यकर्ते राजेद्र पाटील,हेमराज पाटील,पिन्टू कोळी,विलास पाटील, समाधान ठोके,भगवान भालेराव,संजय भालेराव,जितेंद्र भालेराव,यतिन पाटील,रामकृष्ण पाटील व राॅयल फौजी योगेश पाटील मित्रपरीवार सह गावातील ग्रामस्थ मंडळी मोठया संख्येत उपस्थीत होते.सदरील सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.एल.पाटील तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून आर.के.गोरटे यांनी कामकाज पाहीले तर ग्रामसेवक दिनेश पाटील व कर्मचारी ईश्वर पाटील यांनी त्यांना सहकार्य केले.