मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरिता मुख्यमंत्री किसान योजना लागु करण्याबाबतचा महत्वपुर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने नुकताच घेतला आहे.याबाबतची घोषणा राज्य सरकार लवकरच करण्याची शक्यता असल्याने या योजनेचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
सदरील मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर वर्षाला सहा हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.हि रक्कम दर महिन्याला टप्याटप्याने दिली जाणार असून वर्षाकाठी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे.कृषी विभागासोबत बैठकीत विचारविमर्श करून मुख्यमंत्री किसान योजना सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.नवीन आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात याबाबत तरतुद केली जाणार असल्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.केंद्र सरकारने किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षाला सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आश्चर्यकारक भेट दिली होती.आता याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.लवकरच या योजनेची अमलबजावणी होण्याची शक्यता असल्याने त्याचाही फायदा शेतकरी बांधवांना होणार आहे.