Just another WordPress site

आमदार शिरिष चौधरी बनले “तारणहार”;अत्यंत गरीब कुटुंबातील व्यक्तिचे प्राण वाचविण्यात यश

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील मारूळ येथील मजुरी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तीच्या उपचारासाठी आमदारशिरीषदादा चौधरी हे “तारणहार”होऊन धावून आल्याने त्या कुटुंबातील व्यक्तींना त्याचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.आमदार शिरीषदादा चौधरी यांनी घेतलेल्या या पुढाकाराने सर्वत्र कौतुक केले जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील मारूळ येथील रहिवासी सैय्यद खिलाफत अली यांना हृदय विकाराचा झटका आला.त्यांच्या घरची परिस्थिती जेमतेम व अत्यंत गरिबीची व सैय्यद खिलाफत हे घरातील कमविती व्यक्ती व त्यांनाच हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांच्या कुटुंबापुढे समस्याचा मोठा डोंगर उभा राहिला.घरातील कमावती व्यक्तीच गमविणे हा विषय कुटुंबासाठी परवडणारा नव्हता व ती व्यक्ती गमविल्यानंतर संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडणार हे मात्र निश्चित होते.त्यामध्ये हातात पैसा नाही व त्यात जडला जीवघेणा आजार त्यामुळे काय करावे काही समजत नव्हते.अशात आठवण झाली सैय्यद जावेद अहमद यांची त्यांनी क्षणाचाही विलंब न करता यावल रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरिष मधुकरराव चौधरी यांच्याशी संपर्क साधला व सर्व हकीकत सांगितली.त्यानुसार आमदार शिरिष चौधरी यांनी मदतीचा हात पुढे करून सैय्यद खिलाफत अली यांच्या उपचारासाठी शासकीय यंत्रणा हालवून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचारासाठी एक लाखाचा निधी तात्काळ अधिक्षक श्री गजानन हार्ट हॉस्पिटल जळगाव यांच्या खात्यात जमा करून दिली परिणामी सैय्यद खिलाफत अली यांच्या उपचारास गती प्राप्त झाली व त्यांच्यावर यशस्वीपणे उपचार होऊन त्यांचा जिव वाचला.सदरहू सैय्यद खिलाफत अली यांच्यासाठी आमदार शिरिष चौधरी हे “देवदूत” ठरल्याची गावात व परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.

याकामी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळण्याकामी आवश्यक लागणारी कागदपत्रक तयार करण्याकरिता मारुळ सरपंच तथा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे यावल तालुका उपाध्यक्ष सैय्यद असद अहमद यांची मोठी मदत मिळाली.त्यामुळे सैय्यद खिलाफत अली यांचा यशस्वी उपचार मदत होऊन त्यांचा जिव वाचला.आज सैय्यद कुटुंबातील कमविती व्यक्ती ही आधार म्हणून कुटुंबासमवेत उभी आहे व त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.संपूर्ण सैय्यद कुटुंब आमदार शिरिष चौधरी,सैय्यद जावेद अहमद व सरपंच सैय्यद असद अहमद यांनी वेळीच केलेल्या मदतीमुळे आमच्या हक्काची व्यक्ती आज आमच्या सोबत असल्याची भावना व्यक्त करुन समाधान व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.