Just another WordPress site

यावल महाविद्यालयातील आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळा समारोप संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):-

येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळा दि. २७ फेब्रुवारी ते ४ मार्च २३ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.सदरील कार्यशाळेचा समारोप मोठ्या उल्हासित वातावरणात नुकताच संपन्न झाला.

यानिमित्त आयोजित कार्यशाळा समारोप कार्यक्रमात डॉ.सचिन देशमुख यांनी मार्गदर्शन करतांना सांगीतले की,स्त्रियांनी मासिक धर्मासंबंधी सजग राहिले पाहिजे व आपला रोजचा दिनक्रम निवडला पाहिजे त्याचबरोबर योगासने,आहाराबद्दल जागृत असले पाहिजे.तसेच पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे यांनी सायबर गुन्हे व प्रत्यक्ष गुन्ह्यात विशेष करून हॅकिंग,ऑनलाईन फसवणुक या घटनांमध्ये वाढ झालेली असून अशा घटनांबाबत दक्ष राहिले पाहिजे असे सांगितले.सौ.रेखा नितिन देशमुख यांनी विद्यार्थीनींनी स्वयंरोजगारातून आत्मनिर्भर होण्याबाबत मार्गदर्शन केले.शेखर पाटील यांनी डिजीटल बँकिंग व्यवहार काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.कैलास बारेला यांनी कृषी विषयक विविध योजना,कृषी अवजारे तसेच सेंद्रीय शेती या विषयावर मार्गदर्शन केले.या कार्यशाळा अंतर्गत विद्यार्थिनींनी ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन,आय.डी.बी.आय बँक व कृषी विभागाला क्षेत्रभेटी देऊन त्यामध्ये चालणाऱ्या कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली.सदरील  कार्यक्रमाचा समारोप यावल येथील महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.प्रसंगी उपप्राचार्य प्रा.ए.पी. पाटील,उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार,डॉ.एस.पी.कापडे,डॉ.एच.जी भंगाळे,डॉ.आर.डी पवार,मिलिंद बोरघडे,प्रा.गणेश जाधव,प्रा.नरेंद्र पाटील,डॉ. संतोष जाधव,प्रा.मिलिंद मोरे,प्रा.सुभाष कामडी,प्रा.भारती सोनवणे,प्रा.छात्रसिंग वसावे यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.