यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील साकळी येथील अनेक अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले व राष्ट्रवादी आदीवासी विभागाचे एम.बी.तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नुकताच प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तालुक्यातील साकळी येथील अल्पसंख्यांक समाजातील तरूण नासीर खान नजीर खान यांच्यासह सैय्यद सोएब,मेहबुब खान,सलमान खान,इस्माईल खान बिसमिला खान,शेख अलताफ शेख शागीरुददीन,शाहीद खान अजिज खान,अमिरखान हुसेन खान यांच्यासह अनेक कार्यक्रत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नुकताच प्रवेश केला आहे.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले,राष्ट्रवादी आदीवासी विभागाचे एम.बी.तडवी,अब्दुल सईद शेख, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष अॅड देवकांत पाटील,अरुण लोखंडे,हितेश गजरे,मोहसीन खान,हेमंत दांडेकर,एजाज पटेल,किशोर माळी,बापु जासुद,हाजी फारुक शेख,गणेश महाजन यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा अल्पसंख्यांक समाजातील युवकांचा प्रवेश सोहळा संपन्न झाला.प्रसंगी प्रा.मुकेश येवले व पक्षाच्या पदाधिकारी यांच्या हस्ते त्यांच्या पक्ष प्रवेशाचे स्वागत करण्यात आले.