Just another WordPress site

मेळघाट दौऱ्यात राणा दाम्पत्याकडून आदिवासींसोबत रंगपंचमी साजरी

गोपाल शर्मा,पोलीस नायक

अकोला जिल्हा प्रतिनिधी

आमदार रवि राणा व खासदार नवनीत राणा यांचा मेळघाट दौरा सुरु असून या दौऱ्या दरम्यान राणा दाम्पत्य आदिवासी बांधवांशी मिळूनमिसळून घेत आहेत तसेच त्यांच्या समस्या समजून घेत त्या सोडविण्याचाही प्रयत्न केला जात आहे त्यामुळे या परिसरातील आदिवासी बांधवांमध्ये कमालीचा आनंद व जोश पाहायला मिळत आहे.यात राणा दाम्पत्याकडून आदिवासी बंधू भगिनीसोबत सहभागी होऊन आनंद साजरा करण्याची एकही संधी सोडली जात नसून त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत आहेत.त्याचाच भाग म्हणून राणा दाम्पत्याने आदिवासी बांधवांसोबत पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांची उधळण करीत रंगपंचमी साजरी करून त्यांच्या आनंदात भर घेतली.या दौऱ्यादरम्यान ग्रामीण भागाशी असलेली आपली नाळ कायम ठेवत खासदार नवनीत रवी राणा यांनी आपल्या स्वतःच्या हाताने पाट्या वरवंट्यावर ठेचा तयार करून कार्यकर्त्यांना खाऊ घातला.तसेच राणा दाम्पत्याने आदिवासींचे आराध्य दैवत मेघनाथ बाबा यांचे दर्शन घेऊन मेळघाटच्या विकासासाठी शक्ती मिळावी व सर्व मेळघाटवासीयांच्या सुख समृद्धी शांतीसाठी प्रार्थना केली.त्याचबरोबर जागतिक महिला दिनानिमित्त खासदार नवनीत रवि राणा यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

आपल्या मेळघाटातील हॉलिकोत्सव दौऱ्याच्या चौथ्या दिवशी खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांनी सेमाडोह, माखला,चुनखडी, नवलगाव,खडीमल,खंडूखेड,आवागढ,कालपांढरी,कोरडा,गंगारखेडा,पलशा,लहूदा,जरिदा,कामेदा,बारुगव्हान,बिबा आदी गावात जाऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या व संबंधित यंत्रणेला सदरील समस्या तात्काळ सोडविण्याचे निर्देश दिले.सोबतच गावागावातील होळी पुजन करून आदिवासी बंधू भगिणीसोबत रंग खेळून आपली नाळ कायम ठेवली.खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या या आत्मीयतापूर्वक होळी स्नेहमीलन दौऱ्याने मेळघाटवासीयांनी आनंद व्यक्त केला असून आमच्या खासदार आमच्या गावात येऊन आमची संस्कृती जोपासतात,आमच्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि गावागावात विकासकामांची भेट दिली याबद्दल आदिवासी बंधू भगिनींनी राणा दाम्पत्याचे आभार मानले.या संपूर्ण दौऱ्यात आमदार रवि राणा व खासदार नवनीत राणा यांच्या समवेत विविध शासकीय अधिकारी-कर्मचारी,सरपंच,उपसरपंच,विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी,युवा स्वाभिमानचे विभागीय संपर्क प्रमुख उपेन बचले,धारणी तालुकाध्यक्ष दुर्योधन जावरकर,चिखलदरा तालुकाध्यक्ष राजेश वर्मा,विनोद गूहे,अपर्णा गूहे,देवेंद्र टीब,मुकेश मालवीय,मनीष मालवीय,शोएब भाई,प्रमोद शनवारे,राम हेकडे,वर्षा जयस्वाल,वैभव गोस्वामी,सुनील बिलवे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.