Just another WordPress site

किनगाव इंग्लीश स्कुलमध्ये जागतीक महिला दिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल येथे जागतिक महिला दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने सर्व महिला शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचारी यांना फेटा परिधान करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यानिमित्त आयोजीत कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील महिला शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचारी यांना फेटा परिधान करून करण्यात आली.त्यांनतर लेझीम पथक बँड व सर्व विद्यार्थी समवेत महिलांची मिरवणूक गेटपासून तर कार्यक्रमस्थळापर्यंत काढण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी इंग्लिश मीडीयम निवासी पब्लिक स्कुलच्या उपाध्यक्षा शैलेजा विजयकुमार पाटील ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून धरणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज मराठे,डाँ.शशांक हिवरे,डाँ.अशोक हिवरे,ऐश्वर्या भोसले,प्रियांका मराठे हे होते.सर्व प्रथम सर्व महिला शिक्षीका व विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली.यावेळी संस्था उपाध्यक्षा शैलेजा पाटील,व्यवस्थापक पूनम मनिष पाटील,उपमुख्याध्यापिका राजश्री सुभाष अहिरराव,डॉ.ऐश्वर्या भोसले डॉ.प्रियंका मराठे या प्रमुख अतिथींचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.नंतर उपाध्यक्षा शैलेजा पाटील,व्यवस्थापक पुनम पाटील यांनी सर्व महिला शिक्षीका व शिक्षकेतर महिला यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.तसेच सर्व महिला पुरुषांचे औक्षण करतात मग महिला दिनी पुरुषांनी महिलांचे औक्षण का करू नये अशी प्रतिक्रीया प्रा.अशोक पाटील यांनी व्यक्त करत स्वतःपासुन सुरूवात करत आपल्या अर्धांगीनीचे औक्षण केले व अनुक्रमे प्रतीक तायडे,संपत पावरा, दिलीप बिहारी संगेले यांनीही आपापल्या अर्धांगिनींचे औक्षण करत आगळावेगळ्या पद्धतीने महिला दिवस साजरा केला.यावेळी संस्थाध्यक्षा शैलेजा पाटील व व्यवस्थाक पुनम पाटील यांनी महिला दिना निमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्श केले व महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिला दिनाचे महत्त्व पटवून दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी केले तर उपास्थितांचे आभार सुहास भालेराव यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेकरीता स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.