Just another WordPress site

“दिलेला शब्द पाडला नाही म्हणून”नायगाव ग्रामपंचायत सरपंचाविरूद्ध अविश्वास प्रस्ताव पारित

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील नायगाव येथील महिला सरपंच शरीफा तडवी यांनी सरपंचपद तीन जणांमध्ये विभागून घ्यायचे असा ठरल्याचा शब्द न पाळल्याने त्यांच्यावरील दाखल अविश्वास ठराव १३ पैकी १२ सदस्यांनी अविश्वासाच्या बाजूने मतदान करत प्रस्ताव पारीत करण्यात आल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले आहे.

याबाबत तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी दि.९ मार्च रोजी तहसीलदार महेश पवार यांचे अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली.यात येथील सरपंच शरीफा तडवी यांच्याविरुद्ध उपसरपंचासह सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.या सभेमध्ये अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने १३ पैकी १२ सदस्यांनी मतदान केले व अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला.या सभेत उपसरपंच सोनल रामदास पाटील,सदस्य नरेंद्र पाटील,चेतन पाटील,अजय पाटील,उत्तमराव सपकाळे,महेंद्र तडवी,नूरजहान तडवी,वृषाली पाटील,ज्योती देशमुख,रमाबाई कोळी,आलिशान तडवी,राजू तडवी व शरीफा तडवी यांची उपस्थिती होती.सभेचे कामकाजात ग्रामसेवक विलास साळुंखे यांनी सहकार्य केले.
“शब्द पाडला नाही म्हणून”अविश्वास.
येथील ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव होते या पाच वर्षात तिघांना सरपंचपद विभागून देण्याचे ठरविण्यात आलेले होते मात्र दोन वर्ष होऊन देखील सरपंच शरीफा तडवी यांनी राजीनामा न दिल्याने त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला.त्यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव पारित झालेला असल्याने नायगाव ग्रामपंचायतीच्या उर्वरित पुढील तीन वर्षाच्या कार्यकाळासाठी आलिशान तडवी व नूरजहान तडवी यांना विभागून सरपंच पद देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.