Just another WordPress site

यावल येथे उद्या मोफत नेत्र तपासणी शस्रक्रिया शिबिराचे आयोजन

यावल-पोलिस नायक(प्रतिनिधी):- येथील जनसेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यावल व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्ताने दि.१४ सप्टेंबर २२ रोजी जनसेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल नारंबा हॉटेल जवळ भुसावळ रोड यावल येथे सकाळी ९.३० ते १२.३० या कालावधीत मोफत नेत्र तपासणी शस्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.असे आयोजक आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी कळविले आहे.

या शिबिरात इम्पोर्टेड लेन्स सह(एसआयसीएस पद्धतीने)मोतीबिंदू शस्रक्रिया दोन हजार रुपयात व डोळ्यांची साय काढण्याचे ऑपरेशन २५०० रुपयात केले जाणार आहे.तसेच ज्या रुग्णांना फेको मशीनद्वारे ऑपरेशन (घडीची लेन्स घालुन)करायचे असल्यास त्यांच्याकरिता पाच हजार रुपयांपासून पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.शिबिरात उच्च दर्जाच्या अल्कोन इन्फिनिट मशीनद्वारे फेकोसर्जरी करण्यात येईल.शिबिराचे ठिकाणापासून कांताई नेत्रालय जळगाव येथे आणण्या-नेण्याची तसेच रुग्णांकरिता चहा,नाश्ता,भोजन व राहण्याची  मोफत सुविधा करण्यात आलेली आहे.शिबिराच्या माहितीकरिता जनसेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यावल-०२५८५-२९९२३३,युवराज देसर्डा-मो.९४२३०९१५५९,९०९६०६५१५३,सागर लोहार मो.७६२०७२१७९९ व विशाल बारी-मो.८८०५२०५८८४ यांच्याशी सम्पर्क साधावा.तरी तालुक्यातील गरजूंनी या मोफत नेत्र तपासणी शस्रक्रिया शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी केले आहे.शिबिराचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी रेशन कार्डची झेरॉक्स आणणे  बंधनकारक राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.