यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास विभागातर्फे “शिक्षणाचे महत्व” या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पुजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ.एस.पी.कापडे यांनी केले.कार्यक्रमातील
सकाळच्या सत्रात साक्री(धुळे) येथील एस.जी.पाटील महाविद्यालयातील उपप्राचार्य व आयक्यूएसी समन्वयक प्रा.डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी शिक्षणाचे महत्व व गरज या विषयावर मार्गदर्शन केले.फैजपूर येथील डी.एन.महाविद्यालयाचे उपप्राचार्य व आयक्यूएसी समन्वयक
प्रा.डॉ.उदय जगताप यांनी उच्च शिक्षण आव्हाने,समस्या व उपलब्ध संधी तसेच सध्याच्या स्पर्धेच्या युगात पुस्तकी ज्ञानाबरोबरच गुणवत्तापुर्ण शिक्षणाची गरज असून प्रयत्नात सातत्य ठेवुन कौशल्यगुण अंगीकारणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दुपार नंतरच्या सत्रात जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयाचे प्रा.डॉ.साहेबराव पडलवार यांनी ग्रामीण युवक-शिक्षणाची सद्य स्थिती तसेच ग्रामीण भागातील युवकांनी रोजगार शोधतांना नेहमीच व्यवसाययुक्त शिक्षणाबरोबर नोकरी व करिअरच्या नविन संधी शोधण्यासाठी प्रसारमाध्यमांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.तर भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.मुकेश चौधरी यांनी शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास व शिक्षणाचे कोणतेही क्षेत्र निवडतांना योग्य मार्गदर्शन व सकारात्मक विचार ठेवुन वेळेचे नियोजन करणे महत्वाचे असून सध्या सोशल मिडियावरील जाहिरातींचा नकारात्मक प्रभाव विद्यार्थी जीवनावर परिणाम होत असून त्यावर वाद न घालता चर्चा झाली पाहिजे अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना शिक्षण हे ज्ञान मिळवण्याचे साधन आहे ते ज्ञानदान केल्याने वाढतच जाते.ज्ञानदान हि निरंतर प्रक्रिया असून जगात चौदा विद्या व चौसष्ठ कला आहेत त्यात व्यावहारीक जीवन जगण्यासाठी मानसाजवळ एखादी कला असावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची पाटील हिने केले तर आभार उपप्राचार्य एम.डी.खैरनार व प्रा.डॉ.अनिल पाटील यांनी मानले.सदरील कार्यशाळेला उपप्राचार्य प्रा.अर्जुन पाटील,उपप्राचार्य प्रा.संजय पाटील,प्रा.मुकेश येवले,डॉ एच.जी.भंगाळे,डॉ.आर.डी.पवार,डॉ.पी.व्ही.पावरा,प्रा.ईश्वर पाटील,प्रा.सुभाष कामळी,प्रा.नरेंद्र पाटील,प्रा.एम.पी.मोरे,प्रा.गणेश जाधव, प्रा.भारती सोनवणे,डॉ.वैशाली कोष्टी,डॉ.निर्मला पवार,प्रा.सि.टी.वसावे विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेकरिता महाविद्यालयातील विद्यार्थी मिलिंद बोरघडे,संतोष ठाकूर,प्रमोद कदम,प्रमोद जोहरे,अनिल पाटील,अमृत पाटील,प्रमोद भोईटे,डी.डी.पाटील तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने करण्यात आली.