Just another WordPress site

यावल येथे शिवजयंती मोठया उत्साहात साजरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.शिव जयंती उत्सव समितीच्या वतीने मिरवणुकीत ढोल ताशे झांज पथकासह युवकांचे लेझीम पथक यांच्या माध्यमातून शिव जयंतीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

येथील सातोद मार्गावरील रस्त्यावरील श्रीराम मंदिरात यावलचे निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते,यावल शहर तलाठी ईश्वर कोळी,जिल्हा परिषद माजी गटनेते प्रभाकर सोनवणे यांचे हस्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नंतर  शहरातील प्रमुख मार्गाने सवाद्य मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.मिरवणुकीत येथील बुरुज चौका जवळील नगीना मशिदीजवळ हाजी शब्बीर खान,माजी उपनगराध्यक्ष हाजी ईकबाल खान,माजी नगरसेवक सैय्यद युनुस सैय्यद युसुफ,माजी नगरसेवक गुलाम रसुल गु.दस्तगीर, हाजी गफ्फार शाह यांच्यासह मोठया संख्येत मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहुन शिवजयंतीच्या मिरवणुकीचे स्वागत केले.यावेळी उत्सव समितीच्या वतीने मिरवणुकीत ढोल ताशे झांज पथकासह युवकांचे लेझीम पथक सहभागी झाले होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथिनुसार साजरी करण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणुकीमध्ये शहरासह यावल तालुक्यातील शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.शिवजयंती व संपुर्ण मिरवणुक यशस्वीतेकरिता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे जिल्हा उपप्रमुख गोपाळ चौधरी,तालुका उपप्रमुख शरद कोळी,शहरप्रमुख जगदीश कवडीवाले,यावल शहर उपप्रमुख संतोष धोबी,योगेश चौधरी,अजहर खाटीक,डॉ.विवेक अडकमोल,आदीवासी सेनेचे हुसैन तडवी,सागर देवांग,सारंग बेहडे,योगेश राजपुत,विजय पंडीत,मयुर खर्चे,शिवसेना प्रसिध्दी प्रमुख संतोष वाघ,शकील पटेल यांच्यासह शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.