दिलीप गणोरकर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा प्रतिनिधी:-
येथील जिल्ह्याभरात ठिकठिकाणी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकारचा उपक्रम यांचे संयुक्त विद्यमाने तसेच युवा स्वाभिमानी पार्टी द्वारा खासदार सौ.नवनीत रवी राणा यांच्या विशेष प्रयत्नाने दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव व साधने वाटपासाठी दि.१३ मार्च ते २१ मार्च २३ या कालावधीत वैद्यकीय महाशिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदरील शिबीर १३ मार्च सोमवार रोजी तहसील कार्यालय अंजनगाव सुर्जी,१४ मार्च मंगळवार रोजी तहसील कार्यालय दर्यापूर,१५ मार्च बुधवार रोजी तहसील कार्यालय तिवसा,१६ मार्च गुरुवार रोजी आरोग्य केंद्र भातकुली,१७ मार्च शुक्रवार रोजी तहसील कार्यालय अचलपूर,१८ मार्च शनिवार रोजी तहसील कार्यालय अमरावती,१९ मार्च रविवार रोजी तहसील कार्यालय चांदुर बाजार,२० मार्च सोमवार रोजी तहसील कार्यालय धारणी व २१ मार्च मंगळवार रोजी तहसील कार्यालय चिखलदरा या ठिकाणी सकाळी १० वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या महाशिबिराचे आयोजन केले जाणार आहे.सदर शिबिरात दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव व साधनांचे वाटप केले जाणार आहे.लाभ घेऊ इच्छिणाऱ्या दिव्यांग व्यक्तींनी शिबिरात येतांना दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र,आधार कार्ड,जन्म तारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला,१ लाखापर्यंत उत्पन्नाचा दाखला,रहिवाशी दाखला,२ पासपोर्ट साईज फोटो व युडीआयडी कार्ड सोबत आणावे.तरी अमरावती जिल्ह्यातील गरजूंनी या महाशिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.रवीभाऊ राणा,खा.सौ.नवनीत रवी राणा व यावा स्वाभिमानी पार्टीच्या वतीने करण्यात आलेले आहे.