Just another WordPress site

दिव्यांगांच्या हक्कांसाठी युवा स्वाभिमान पार्टीने दिला यशस्वी लढा;महेंद्रभाऊ पाटील यांचा मोलाचा हातखंडा

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

युवा स्वाभिमान पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा बहुजन टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष व माहिती अधिकार सामाजिक  कार्यकर्ता महेंद्रभाऊ पाटील यांनी माहिती अधिकाराचा वापर करून फुलगाव ग्रामपंचायत मधील चार वर्षाचा भोंगळ कारभाराचा पर्दाफाश करून दिव्यांगांना न्याय मिळवून देत त्यांना दिव्यांगांना लागणाऱ्या साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,युवा स्वाभिमान पार्टी चे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा बहुजन टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष महेंद्रभाऊ पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून माहिती अधिकाराच्या माध्यमातून भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील ग्रामपंचातीमध्ये दिव्यांगांसाठीचा अनुशेष शिल्लक होता परंतु सदरील निधी हा गेल्या चार वर्षांपासून जिल्हा अपंग निधीत जमा न करता तसाच शिल्लक ठेवण्यात येत होता व दिव्यांगांकडे दुर्लक्ष केले जात होते.सदरील बाब युवा स्वाभिमान पार्टी चे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा बहुजन टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष महेंद्रभाऊ पाटील यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही.त्यांनी माहिती अधिकाराचा वापर करून स्वखर्चाने कागदपत्रे जमा करून हि बाब जनतेच्या लक्षात आणून दिली असून अपंगांना न्याय मिळवून देण्याची महत्वाची भूमिका बजावली आहे.

यात महेंद्रभाऊ पाटील यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सर्व अपंगांना प्रत्येकी चार हजार रुपये मानधन देण्यात आले असून त्याचबरोबर या दिव्यांग व्यक्तींना युवा स्वाभिमानी पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ पाटील,प्रशासक गणेश ठाकूर व ग्रामसेवक जितेंद्र आप्पासाहेब यांच्या हस्ते वाकर,कुबड्या,काडी अशा २८ वस्तूंच्या साहित्यांचे वाटप नुकतेच करण्यात आले आहे.यात दोन वर्षाचे अनुशेष शिल्लक असून पुढील दोन वर्षाच्या शिल्लक अनुशेषासाठी पाठपुरावा करून दिव्यांगांचा प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध असून याकरिता प्रशासक व ग्रामसेवक यांचे यापुढेही असेच सहकार्य अपेक्षित असल्याची मनीषा युवा स्वाभिमानी पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आहे.तर महेंद्रभाऊ पाटील यांनी केलेल्या या कार्याबद्दल अपंग बांधवांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.याप्रसंगी गणेश पाटील,गोपाळ सुतार,स्वप्नील बाऊस्कर,संगीता चौधरी यांच्यासह दिव्यांग बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.