Just another WordPress site

किनगाव ते धुळे दरम्यान शेतकरी संघटनेच्या वतीने सहवेदना व निर्धार पदयात्रेचे आयोजन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील किनगाव येथील शेतकरी संघटनेच्या वतीने दि.१३ते १९ मार्च दरम्यान सहवेदना व निर्धार पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.सदरील पदयात्रा ही किनगाव ते धुळे(चोपडा,अमळनेर) असे एकुण ११० किलोमीटर जाणार आहे.या पदयात्रेला डॉ.राजीव बसर्गेकर (नवी मुंबई) हे यात्रेचे मुख्य संयोजक असुन सुभाष कच्छवे (परभणी) यांचेही मार्गदर्शन व सहकार्य लाभणार आहे.

सदरील पदयात्रेला दि.१३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता किनगाव येथील शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते गणेश दिनकर पाटील(कडू आप्पा) यांना श्रद्धांजली वाहून ही पदयात्रा धुळ्याकडे मार्गस्थ करण्यात आली.ही पदयात्रा किनगाव ते शेतकरी संघटनेचे धुळे येथील दिवंगत नेते रवी देवांग यांची कर्मभूमी अशी जाणार आहे.या पदयात्रेत शेतकरी आमदार विठ्ठलराव डांगे(नांदेड),कालिदास आपेट,चौधरी सर(बीड),सतीश गलांडे (परभणी),हृतगंधा देशमुख (जळगाव),राजीव बसर्गेकर(नवी मुंबई),रामकिशन आप्पा रुद्राक्ष,जवळाबाजार जिल्हा हिंगोली,तानाजी फडतरे देशमुख,बालाजी आबादार,नांदेड,कालिदास आपेट,गिरवली जिल्हा बीड,निळकंठ डांगे,जवळा बाजार,जिल्हा हिंगोली,सतीश गलांडे परभणी,चौधरी सर,अंबाजोगाई,विठ्ठल राज डांगे,कंधार नांदेड,शामरावजी धावडे,दहिगाव ता.चांदुर रेल्वे,अमरावती व अमर हबीब आणि अनंत देशपांडे यांची किनगावला आणि धुळे येथे उपस्थिती राहणार आहे.
किनगाव येथील पदयात्रा शुभारंभ प्रसंगी श्रद्धांजली कार्यक्रमात माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी,सरपंच निर्मलाताई संजय पाटील,प.स.चे माजी उपसभापती उमाकांत रामराव पाटील,राम मंदीर संस्थान अध्यक्ष के.जे.अण्णा पाटील,प्रगतशील शेतकरी सुरेश जिवराम चौधरी,चंन्द्रकांत विठ्ठल चौधरी,डाँ.योगेश पालवे,माजी ग्रा.प.सदस्य संजय सयाजीराव पाटील,माजी प.स.सदस्य प्रशांत भगवान पाटील, ग्रा.प.सदस्य प्रमोद रामराव पाटील,रवि टेलर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थीत होते.या कार्यक्रमाचे प्रास्तावीक संभाजी वराडे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.