यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील न्हावी येथील विवाहित महिला फरजानाबी अश्पाक शेख हिला घरात कामधंदा येत नाही म्हणुन सासरच्या मंडळींकडून मारहाण करून छळ केल्या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की,तालुक्यातील न्हावी येथील सासर असलेली फरजानाबी अश्पाक शेख यांचा विवाह तिन वर्षापुर्वी समाजाच्या रितीरीवाजाप्रमाणे शेख अश्पाक शेख मुश्ताक याच्याशी झालेला असुन विवाहीत महिलेस दोन मुली आहेत. दरम्यानच्या काळात लग्न झाल्यापासुन यावलचे माहेर असलेल्या विवाहहितेस सासरची मंडळीकडून किरकोळ कारणावरून शिवीगाळ केली जात होती.विवाहितेचा पती अशपाक शेख हा लग्न झाल्यापासुन कामधंदा करीत नसल्याने तो त्याच्या पत्नीस कामाला जायला सांगत असे.याकरिता पती अशपाक शेख मुश्ताक,मोठे दिर तौसीफ शेख मुश्ताक,छोटे दिर समीर शेख मुश्ताक,सासु शमीम शेख मुश्ताक सर्व राहणार न्हावी तालुका यावल यांनी तुला नवरा आवडत नसेल तर दुसरे लग्न करून घे असे म्हणुन माझा मानासिक व शारीरिक छ्ळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली.दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर विवाहीता ही त्रासाला कंटाळुन आपल्या यावल येथील माहेरी निघुन आली. सदर विवाहिता फरजाना बी शेख अशपाक वय २३ वर्ष हिने यावल पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळी विरूद्ध फिर्याद दिल्याने विविध कलमान्वये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहेत.