यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २२ वर्षीय महीलेचा एकाने एकतर्फी प्रेमातुन पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी त्या तरुणा विरूद्ध यावल पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की,तालुक्यातील एका गावात २२ वर्षीय महिला ही आपल्या कुंटुबासह वास्तव्याला आहे. त्याच गावात राहणारा नितिन सुरेश कोळी याने महिलेवर एकतर्फी प्रेमातुन महीलेचा पाठलाग केला.त्यानंतर १ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता या गुन्ह्यातील संशयित आरोपी नितिन कोळी याने तिचा रस्ता अडवुन सांगीतले की,मी तुझ्यावर प्रेम करतो तु माझ्यावर प्रेम व संबंध ठेव असे सांगीतले याला माहिलेने नकार दिल्याने तरुणाने तिचा विनयभंग केला.हा प्रकार घडल्यावर सदर महीलेने यावल पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी नितिन कोळी याच्याविरूद्ध फिर्याद दिल्याने त्याच्याविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ सहाय्यक फौजदार अजीज शेख व पोलीस करीत आहेत.