यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
ग्रामीण पातळीवर महिला विकास व बालसंगोपन आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी महत्वाची भुमिका,कर्तव्य व जबाबदारी पार पाडणाऱ्या आशावर्कर(स्वयंसेविका) यांच्या वतीने दि.१४ मार्च रोजी “आशा दिवस” विविध स्पर्धांचे आयोजन करून मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
यानिमित्त यावल पंचायत समिती जुन्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.मनिषा बांगर (जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी जिल्हा परिषद )या होत्या.तर प्रमुख पाहुणे प्रविण जगताप (जिल्हा समूह संघटक जिल्हा परिषद),तालुका आरोग्य अधिकारी मनोज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन श्रीमती प्रतिभा ठाकूर तालुका समूह संघटक यांच्या वतीने करण्यात आले.यात सकाळ पासून आशा सेविका यांनी विविध स्पर्धात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली.यावेळी घेण्यात आलेल्या संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम पारितोषिक छाया भरत बादशहा अंजाळे,द्वितीय रेखा नरेंद्र झांबरे बामणोद,हजरा फिरोज तडवी मारुळ,कविता वाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक सुनीता महेंद्र पाटील, वत्सला गजानन सपकाळे,किरण यशवंत पाटील,सामान्य ज्ञान स्पर्धत सलमा रुबाब तडवी चुंचाळे,माया कन्हैयालाल धीवर साकळी,शारदा जीवन कोळी पिंपरूळ,लेखन स्पर्धत दुर्गा सुरेश तायडे,तनुजा संतोष पाटील,जयश्री संतोष जंगले,रांगोळी स्पर्धत रूपाली खुशाल येवले,आशा भरत पाटील,छाया मधुकर वाघुळदे,संगीत खुर्ची स्पर्धेत गटप्रवर्तक सरला तडवी,नीलिमा चौधरी,लीना पाटील यांनी यश मिळविले.तसेच यावेळी सर्व गटप्रवर्तक व आशा वर्कर यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.प्रसंगी प्रा.आ.केंद्र साकळीच्या वतीने अंधश्रद्धा या विषयावर लघू नाटिका सादर करण्यात आली.कार्यक्रमात सर्व आशासेविका व गटप्रवर्तक यांनी महिला व बाल मुत्यू रोखण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.मनीषा बांगर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रम यशस्वीतेकरिता आयसीटीसी विभागाचे समुपदेशक वसंतकुमार संदानशिव,रविन्द्र माळी,मनोज चव्हाण,पवन जगताप,शकील तडवी,मिलिंद राणे,मिलिंद जंजाळे,अमित तडवी,नरेंद्र तायडे,संतोष भंगाळे,डी.सी.पाटील,जयंत पाटील,आशिष शिंदे,प्रशांत शिंपी यांनी विशेष सहकार्य केले.