यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवेत कार्यरत असलेले आरोग्य सेवक विठ्ठल बळीराम भिसे(वय ३८ वर्षे) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.
विठ्ठल भिसे हे मुळगाव जरोदा ता.कळमनुरी जि.हिंगोली येथील रहिवाशी असून ते किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत नायगाव व किनगाव परीसरात आरोग्य सेवक म्हणून सेवा बजावत होते.विठ्ठल भिसे हे कार्यतत्पर व मन मिळाऊ स्वाभावाचे होते.त्यांच्या मुळगावी दि.१५ रोजी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.दोन वर्षापुर्वी आलेल्या कोराना संकटाच्या काळात लसिकरणासाठी किनगाव प्राथमिक आरोग्य केंन्द्राने केलेल्या उल्लेखनीय कार्यात वैद्यकीय आधीकारी डाँ.मनिषा महाजन यांना सर्व सहकाऱ्यांसह विठ्ठल भिसे यांचे मोठे मोलाचे सहकार्य मिळाले होते.एकंदरीतच भिसे हे आपल्या उत्तम आरोग्य सेवेबाबत किनगाव,नायगाव,वाघझीरा,मालोद या परीसरातील नागरीकांशी परीचीत होते.त्यांच्या निधनाने किनगाव प्राथमिक आरोग्य केंन्द्रासह परीसरात शोक व्यक्त केला जात आहे.त्यांच्या पश्चात आई,वडील,भाऊ,वहीणी,पत्नि,८ वर्षाचा मुलगा व ६ वर्षाची मुलगी असा परीवार आहे.