यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
शासकीय कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन लागु करण्यात यावी यामागणीकरिता राज्य पातळीवरून संपुर्ण राज्यभरात शासकीय कर्मचारी यांनी गेल्या तिन दिवसापासुन बेमुदत सुरू केला आहे.या संपामुळे जवळपास सर्व शासकीय कार्यालयांतील कर्मचारी संपात सहभागी झालेले असल्याने या कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसुन येत आहे त्यामुळे अनेकांची विविध कामे पेंडिंग राहात असल्यामुळे त्याचा जनसामान्यांच्या जनजीवनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
जुनी पेन्शन लागु करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील शासकीय व निमशासकीय कर्मचारी हे दिनांक १४ मार्च पासुन बेमुदत संपावर गेलेले असल्याने आजपावेतो संप सुरूच असल्यामुळे शासकीय कार्यालय ओस पडू लागले आहेत त्याचा मोठा फटका नागरी सुविधांवर पडतांना दिसून येत आहे.तसेच मार्च अखेर असल्याने विविध कार्यालयांतील वसुलीसोबतच महसुल प्राप्तीला देखील या संपाचा मोठा फटका बसणार आहे.मागील तिन दिवसापासुन सुरू असलेल्या या शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपात पंचायत समिती,महसुल विभाग, आदीवासी एकात्मिक कार्यालय,दुय्यम निबंधक,वन विभाग,नगरपरिषद,आरोग्य कर्मचारी अशी जवळपास सर्व शासकीय यंत्रणा या संपात सहभागी झालीली असल्याने संपूर्ण शासकीय कामे ठप्प झाली आहे.मात्र संप काळात देखील इयत्ता १०वी व १२ वी शालांत परीक्षा सुरळीत सुरु आहेत हे विशेष आहे.संपापुर्वी ज्या शिक्षकांची नेमणुक परीक्षा केन्द्रांवर करण्यात आलेली होती त्याठिकाणी सदरील शिक्षक इमाने ईतबारे कर्तव्य पार पाडीत आहेत.त्यामुळे किमान शिक्षकांच्या मेहरबानीमुळे १० वी १२ विच्या परीक्षा सुरळीत चालू आहेत.