गोपाल शर्मा,पोलीस नायक
अमरावती जिल्हा प्रतिनिधी :-
येथील युवा स्वाभिमान पार्टी खासदार सौ.नवनीत रवी राणा व आमदार रवीभाऊ राणा यांच्या संकल्पनेतुन व भारतीय कृत्रिम अवयव निर्माण निगम यांच्या माध्यमातून आयोजित दिव्यांग शिबीर नोंदणी अभियानास दिव्यांग बांधवांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
यानिमित्त भारतीय कृत्रिम अवयव निर्माण निगम (अल्मिको) यांच्या माध्यमातून व युवा स्वाभिमान पार्टी खासदार सौ.नवनीत रवी राणा व आमदार रवीभाऊ राणा यांच्या संकल्पनेतुन दि.१८ मार्च २३ शनिवार रोजी अमरावती तहसील कार्यालयात दिव्यांग शिबीर नोंदणी अभियान राबविण्यात आले.यात अमरावती तालुक्यातील अंध,मतिमंद,मूकबधिर,अस्थिव्यंग,समिश्र,बहूविकलांग दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घेतला.यावेळी खासदार सौ.नवनीत राणा,आमदार रवीभाऊ राणा,सुनीलभाऊ राणा,शैलेन्द्रजी कस्तुरे,विनोद गुहे,संजय हिंगासपुरे,विनोद जायलवाल,पराग चिमोटे,वीरेंद्र उपाध्याय,नाना आमले,निलेश भेंडे,अनुप खडसे,सचिनदादा भेंडे,बाळासाहेब इंगोले,साक्षी उमक,आगाशे ताई, शालिनीताई देवरे,विलास वाडेकर,संजय मुंडले,अजय जयस्वाल,पंकज शर्मा,मनोज ढवळे,राहूल काळे,विजय मलिक,तरडेजा काका,अशोक इंगळे,महेश किल्लेकर,पवन केशरवानी,संजय गायकवाड,गणेशराव गायकवाड,युवा स्वाभिमान महिला आघाडी,युवा सन्मान विद्यार्थी आघाडी, व सर्व युवा स्वाभिमानी पार्टी अमरावती तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.प्रसंगी शिबिरात दिव्यांगांना मोफत वस्तू वाटपासोबतच मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप सुद्धा करण्यात आले.