Just another WordPress site

नायगाव येथे उमराह शरीफ वरून ईबादत करून परतणाऱ्या भाविकांचा सत्कार

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील नायगाव येथील आदिवासी ग्रामविकास मंडळ या सामाजिक संघटनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्ताने येथील उमराह शरीफ वरून ईबादत करून दि.१९ रोजी परत आलेल्या नऊ भाविक व्यक्तींचा प्रत्येकी एक ड्रेस व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यानिमित्त आयोजित कार्यक्रमात गावातील मस्जिद परिसरात हाजी जंगेखां बाबा तडवी,हाजी इतबार तडवी,हाजी उस्मान तडवी,हाजी अरमान तडवी,हाजी अजित तडवी,हज्जन अलिशानबाई तडवी,हज्जन रस्तूलबाई तडवी,हज्जन देवकाबाई तडवी,हज्जन सुरेखाबाई तडवी यांना एक ड्रेस व गुलाबगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी हजरत पीर गैबन शाह बाबा यांच्या मजारवर चादर व प्रसाद चढवून दुवा करण्यात आली.समाजसेवक एन.डी.तडवी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना अश्याच पद्धतीने पुढील वर्षी नायगाव गावातून यापेक्षाही जास्त संख्येने उमराह शरीफला ईबादत साठी जावे अशी भावना व्यक्त केली.यावेळी हाजी उस्मान तडवी व हाजी जंगेखां बाबा तडवी यांनी उमराह शरीफ बाबत आपले अनुभव व्यक्त केले व सत्कार केल्याबद्दल उपस्थितांचे आभार मानले.प्रसंगी आदिवासी ग्रामविकास मंडळाच्या फलकास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी आदिवासी ग्रामविकास मंडळाचे सदस्य फकिरा तडवी,समीर तडवी,मेहेरबान तडवी,कुर्बान तडवी,कलिंदर तडवी,सिराज तडवी, महेंद्र तडवी,रुबाब तडवी,दिलदार तडवी,रफिक तडवी,सुपडू तडवी,पिरखा तडवी,जहाबीर तडवी सर,विनोद तडवी,करामत तडवी,राजू तडवी,कलिंदर समशेर तडवी,ईसा महेबु तडवी,सायबु तडवी,मुबारक तडवी,नामदार तडवी,जुम्मा तडवी,फिरोज तडवी,शब्बीर तडवी, मकबूल तडवी,निसार सुपडू तडवी,सिकंदर तडवी,रोशन तडवी,इस्माईल तडवी,संजय तडवी,जाकीर तडवी,राजू गुलझार तडवी,दिलरुबाब तडवी,सुभेदार तडवी,राजू चांदखा तडवी,फिरोज नूरखा तडवी,इस्माईल तहारा तडवी,रफिक गोंडू,बादल तडवी,नईम तडवी,आकाश तडवी, फकिरा सुभान तडवी,मुबारक सुपडू तडवी,मोनू तडवी,सलमान तडवी,सलीम हबीब तडवी,सादिक तडवी,सलीम गुलशेर तडवी,बीसा तडवी, पिंटू तडवी,जालम तडवी,शरीफ तडवी,जहांगीर तडवी,अकिल शाह यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेकरिता मंडळातील सर्व सदस्य व तडवी समाजातील ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.