यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील दहिगाव येथे गावातील प्रसिद्ध असे श्री.महादेव व मारुती मंदिर मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास दि.२२ मार्च पासुन भक्तीमय वातावरणात प्रारंभ होत आहे यानिमित्ताने भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील दहिगाव येथील महादेव व मारुती मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा दि.२३ मार्च रोजी होणार आहे.यानिमित्ताने श्री.महाशिवपुराण ज्ञान यज्ञ सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला आहे.यानिमित्त दि.२३ रोजी सायंकाळी भव्य सात दिंडी सोहळ्याची मिरवणुक गावातून काढण्यात येणार आहे.या सप्ताहाची रुपरेषा पुढील प्रमाणे दुपारी अडीच वाजता व रात्री साडेसात वाजता कथा वाचन होईल कथेची पूर्णाहुती मीती चैत्र शुद्ध अष्टमी दि.२९ मार्च रोजी होणार आहे.सदरील सप्ताहात सद्गुरु शास्त्री स्वामी सरजूदासजी वडताल हे वक्ता राहणार आहेत तर आचार्य राकेशप्रसादजी महाराज प्रेमप्रकाश दासजी प्रभू स्वामी उपस्थित राहणार आहे.तर बुधवारी सायंकाळी भव्य दिंडी सोहळा काढण्यात येणार आहे.सप्ताहात शिवसती दर्शन,शिवपार्वती विवाह,गणपती प्रगट्य,दत्त चरित्र,हनुमंत अवतार,ज्योती लिंग पूजन,वृंदावन की रासलीला,भक्तीमती राणी मीराबाई,सुंदर कांड पाठ अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे.काल्याचे किर्तन हरिभक्त परायण राजेंद्रजी महाराज केकत निंभोराकर यांचे रात्री आठ वाजता होणार आहे.तर दैनंदिन कार्यक्रमात रोज सकाळी साडेपाच वाजता व संध्याकाळी साडेपाच वाजता काकड आरती होणार आहे.दि.२९ रोजी कथा वेळ सकाळी आठ वाजता,महाप्रसाद दुपारी बारा वाजता आणि दिंडी सोहळा सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आलेले आहे.सदरील कार्यक्रमात समस्त सहकारी भजनी मंडळ आडगाव,कासारखेडा,चिंचोली,डोनगाव, किनगाव,मालोद,नायगाव,साखळी,चिंचाळे,विरवली,नावरे,कोरपावली,मोहराळे,दहिगाव येथील भजनी मंडळ सहभागी राहणार आहेत.तर हरिभक्त परायण नामदेव गुरुजी हरिभक्त परायण उद्धव महाराज,राहुल महाराज,प्रथमचंद्र महाराज,रमेश महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी दहिगाव यांनी केले आहे.