बुलढाणा-पोलीस नायक
जिल्हा प्रतिनिधी:-
संग्रामपूर तालुक्यातील अवैद्य धंदे कायमचे बंद करण्यात यावे यामागणीकरिता येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तामगाव पोलीस स्टेशनच्या समोर दि.२१ पासून उपोषण सुरू करण्यात आलेले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,संग्रामपूर तालुक्यात ठिकठिकाणी अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असून अवैद्य धंद्यांच्या अतिरेकामुळे नवजवान तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे मोठ्या प्रमाणात आकर्षिली जात आहे.त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आलेले असून अनेकांचे संसार उघड्यावर येऊ पाहात आहे.याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संग्रामपूर तालुक्यातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे या मागणीचे निवेदन संग्रामपूर पोलीस स्टेशन सोनाळा येथे देण्यात आलेले होते.परंतु त्यांच्याकडून यावर कुठलीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने अखेर दि.२१ मार्च पासून तामगाव पोलीस स्टेशन समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत यांनी दिली आहे.