जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
संपूर्ण महाराष्ट्रातील नवतरुणांमध्ये डोकेदुखी ठरू पाहत असलेली समस्या म्हणजे मुलांना लग्नाकरिता मुली न मिळणे हे होय.मुलींचा घटता आलेख या गोष्टीला जबाबरदार असून सदरील समस्येमुळे महाराष्ट्रातील विशेष करून हिंदू धर्मीयांमध्ये मुलांना लग्नाकरिता मुली मिळणे फारच कठीण समस्या बनली आहे.याचा गैरफायदा चंद्रपूर,भंडारा,गोंदिया,गडचिरोली,नागपूर सह महाराष्ट्रातील काही भागातील संधीसाधू यांच्याकडून एजंटांच्या माध्यमातून तरुणांची व त्यांच्या परिवारांची लाखो रुपयांमध्ये फसवणूक केली जात आहे.मात्र “तेरी भी चूप व मेरी भी चूप”या उक्तीनुसार चुप्पी साधली जात असल्याने हे रॅकेट दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असल्याचे दिसून येत आहे.तरी मुलींचे लग्न लावून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा कायमचा पर्दापाश करण्यात यावा अशी मागणी युवा स्वाभिमानी पार्टी जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ पाटील यांनी केली आहे.याबाबत महेंद्रभाऊ पाटील यांच्याच परिवारास चंद्रपूर येथील लक्ष्मी टेकम या तरुणीने तब्बल ५ लाख रुपयांमध्ये आपली फसवणूक केली असल्याची माहिती त्यांनी प्रस्तुत पोलीस नायक प्रतिनिधी जवळ बोलतांना सांगितली आहे. परिणामी लग्न जुळवितांना आपण फसविले जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील रहिवाशी राहुल काशिनाथ पाटील यांचा विवाह दि.११ फेब्रुवारी २३ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील तरुणी लक्ष्मी टेकम हिच्यासोबत फुलगाव येथे करण्यात आला.लग्नाआधी नवविवाहिता तरुणी लक्ष्मी बाप रामचंद्र टेकम रा.कोरपना ता.कोरपना जिल्हा चंद्रपूर,रवींद्र चंद्रकांत शिंपी रा.कांचन नगर जळगाव व मनीषा स्वप्नील महाजन रा.फुलगाव ता.भुसावळ यांनी वेळोवेळी लग्न जुळण्याचा गैरफायदा घेऊन मुलगी पाहण्यापासून तर लग्नलागेपर्यंत वेगवेगळ्या सबबीखाली जसे की आमची परिस्थिती फारच गरिबीची असून आमचे घरकुल मंजूर झालेले आहे त्याकरिता घरकुल बांधकामाच्या नावाखाली ६४ हजार रूपये, नवविवाहितेच्या आईच्या नावावर पोलिसात फौजदारी गुन्हा नोंद झाल्याने तिला सोडविण्यासाठी १५ हजार रुपये,जळगाव येथे राहात असलेला नवविवाहितेचा जिजाजी याच्या वाढदिवसानिमित्ताने वाढदिवस कार्यक्रमाचा खर्च करण्याकरिता २० हजार रुपये,नवविवाहितेची बहीण रंजना रा.जळगाव हीला भूत चुडेल ने झपाटलेले असल्याने तिला बांभोरीच्या गुलाब दर्ग्यावर उपचार करण्याच्या नावाखाली तीन हजार रुपये तसेच लग्नाच्या दिवशी नवविवाहिता लक्ष्मी टेकम हिचा जिजाजी रवींद्र शिंपी यांच्या मागणीनुसार ३७ हजार रूपये,लग्नासाठी नातेवाईकांना भाड्याकरिता चार हजार रुपये,लक्ष्मीची मैत्रीण मनीषा महाजन हिच्याकडे ४० हजार रुपये त्याचबरोबर लग्नाचा सर्व खर्च तसेच नवविवाहितेकरिता सोने चांदीचे आभूषण यांचा खर्च देखील राहुल पाटील यांनी केलेला होता.यात राहुल पाटील यांच्या परिवाराची तब्बल ५ लाख रुपयांमध्ये फसवणूक चंद्रपूर येथील रॅकेटने केलेली आहे.तरी मुलींचे लग्न लावून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा कायमचा पर्दापाश करण्यात यावा अशी मागणी युवा स्वाभिमानी पार्टी जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ पाटील यांनी केली आहे.लग्न जुळवितांना आपण फसविले जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.याबाबत नवविवाहिता तरुणी लक्ष्मी बाप रामचंद्र टेकम रा.कोरपना ता.कोरपना जिल्हा चंद्रपूर,रवींद्र चंद्रकांत शिंपी रा.कांचन नगर जळगाव व मनीषा स्वप्नील महाजन रा.फुलगाव ता.भुसावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये अर्जाद्वारे महेंद्र पाटील यांनी केली आहे.