Just another WordPress site

अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी १ एप्रिल पासून मोफत प्रशिक्षणाचे आयोजन

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र रावेर कार्यालयामार्फत अनुसुचित जमातीतील उमेदवारांना स्पर्धा परिक्षेकरिता १ एप्रिल ते १५ जुलै २३ असे एकुण ३ महिने १५ दिवसांचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.प्रवेश मिळवण्याकरीता www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
या प्रशिक्षणाच्या नावनोंदणीकरिता उमेदवार हा अनुसूचित जमातीचा असावा.(जातीचा दाखला आवश्यक),उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा,उमेदवार हा शालांत परिक्षा (१०वी) उत्तीर्ण असावा,उमेदवार हा १८ वर्ष वय पुर्ण झालेला असावा.या प्रशिक्षणामध्ये भाग घेणाऱ्या आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना विविध शासकीय/निमशासकीय निवड समित्यांमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परिक्षांची पूर्वतयारी करुन घेतली जाणार आहे.प्रशिक्षण काळात उपस्थित प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणामध्ये प्रवेश मिळविण्याकरीता शाळा सोडल्याचा दाखला,१० वी,१२ वी गुण पत्रिकेची प्रत,आधारकार्ड,बॅक पासबुक झेरॉक्स,दोन पासपोर्ट साईज फोटो,जातीचा दाखला आदि कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती व मुळ प्रती असणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र,प्लॉट नं. २,शनि मंदीरा मागे,स्टेशन रोड,पंचायत समिती जवळ रावेर येथे प्रत्यक्ष १० ते २ वाजेपर्यंत सपर्क साधावा.तसेच प्रशिक्षणाच्या साडेतीन महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्वत: करावी लागेल.अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक-०२५८४-२५१९०६,भ्रमणध्वनी क्रमांक-८६६८८१७८९३ वर संपर्क साधावा असे आवाहन वि.जा. मुकणे,कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी रावेर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.