यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्या.डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक प्रबोधिनी कार्यक्रमांर्तगत भारतीय संस्कृतीचा इतिहास या विषयावर नुकतेच व्याख्यान आयोजीत करण्यात आले.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन उपप्राचार्य प्रा. एम.डी.खैरनार,प्रा.ए.पी.पाटील उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.गणेश जाधव यांनी भारतीय संस्कृतीचा इतिहास व विकास याबाबत मार्गदर्शन करतांना त्यांनी मानवी संस्कृतीचा विकास,मौर्य,तुघलक,लोधी घराणे,अश्मयुगीन,सिंधु,वैदिक,मार्तृसत्ताक संस्कृती, आरण्यक्य,उपनिषद,दंडकारण्य इ.विषयावर ऐतिहासिक पुरावे देत सखोल अशी माहिती दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांनी मार्गदर्शन करतांना भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली असून तीचा इतिहास जुना व व्यापक असून त्यामुळे इतिहास समजून घेतांना कालखंड अभ्यासणे महत्वाचे ठरते असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.सुभाष कामडी यांनी केले तर आभार प्रा.डॉ.एस.पी.कापडे यांनी मानले.यावेळी प्रा.डॉ.हेमंत भंगाळे,प्रा.डॉ.पी व्ही पावरा,प्रा.डॉ.आर डी पवार प्रा.संजय पाटील,प्रा.संजीव कदम, प्रा.मनोज पाटील,प्रा.शेखर चव्हाण,प्रा.डॉ.संतोष जाधव,प्रा.डॉ.वैशाली कोष्टी,प्रा.नरेंद्र पाटील,प्रा.मिलींद मोरे,प्रा.छात्रसिंग वसावे,मिलींद बोरघडे, संतोष ठाकूर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.