Just another WordPress site

कष्टाने उभ्या केलेल्या सहकारी संस्था आर्थिक स्वार्थ व राजकारणामुळे डबघाईला

महाविकास आघाडीच्या आढावा बैठकीत नेत्यांनी व्यक्त केली खंत

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील रावेर व यावल तालुक्यातील सहकार क्षेत्रातील जाणकार जेष्ठ नेत्यांनी अतिशय कष्टाने शेतकऱ्यांच्या हितासाठी उभ्या केलेल्या आघाडीच्या सहकारी संस्था विरोधकांनी केवळ राजकारण करीत ताब्यात घेतल्या व आर्थिक गोंधळात टाकुन डबघाईला आणुन त्यांची वाट लावली.हे पाप कुणी केले?हे सर्वांना कळून चुकले असुन येणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी बहुमताने निवडून येईल असा विश्वास रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी यावल तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या सभागृहात संपन्न झालेल्या महाविकास आघाडीच्या चिंतन बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या उमेदवारांची उमेदवारी निश्चित करण्यासाठी तात्काळ एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे यावेळी बैठकीत जाहीर करण्यात आले.यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढील महीन्यात होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकी संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी महाविकास आघाडीचे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना(ठाकरे गट) व राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाची संयुक्त बैठक काल दुपारी ४ वाजता पार पडली.या बैठकीस आमदार शिरीष चौधरी,माजी आमदार रमेश चौधरी,राष्ट्रवादीचे जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष गिरधर पाटील,सरचिटणीस विजय प्रेमचंद पाटील,यावल न.प.चे माजी नगराध्यक्ष राकेश कोलते,उपनगराध्यक्ष अस्लम शेख नबी,शिवसेनेचे कृउबाचे माजी सभापती भानुदास चोपडे,कृउबाचे माजी संचालक सुनिल बारी,माजी सभापती नितिन व्यकंट चौधरी,केतन किरंगे,जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे,पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील,मोहराळा सरपंच नंदा महाजन,राष्ट्रवादी महीला आघाडीच्या तालुका अध्यक्ष प्रतिभा निळ,कृउबाचे माजी संचालक विनोदकुमार पाटील,पुंजो पाटील,सत्तार तडवी,सुनिल बारी,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, शिवसेनेचे आर.के.चौधरी,खरेदी विक्री संघ माजी चेअरमन सुनिल फिरके,कॉंग्रेसचे हाजी गप्फार शाह,मनोहर महाजन,बापु जासुद,अरुण लोखंडे,नईम शेख,डॉ.हेमंत येवले,वसंत गजमल पाटील,दहिगाव माजी सरपंच दिलीप पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील पदधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीचे सुत्रसंचालन प्रा.मुकेश येवले व शेखर पाटील यांनी केले तर आभार राष्ट्रवादीचे नाना बोदडे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.