गोपाल शर्मा,पोलीस नायक
अमरावती जिल्हा प्रतिनिधी :-
युवा स्वाभिमानी पार्टीच्या वतीने दरवर्षी १० वी तसेच १२ विच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो.खासदार नवनीत रवी राणा यांनी उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात दिल्लीला नेवून ससंद भवन,राष्ट्रपती भवन आणि लोकसभा येथील कामकाज कसे चालते हे प्रत्यक्ष दाखविण्याचे अभिवचन दिले होते.याच अनुषंगाने काल हे विद्यार्थी-विद्यार्थिनींना गोंडवाना एक्स्प्रेसने दिल्ली अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले.या संपूर्ण दौऱ्यांच्या प्रवास,निवास व भोजन व्यवस्था यांचा खर्च आमदार रवी राणा व खासदार नवनीत रवी राणा यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच हे अभिनव पाऊल आमदार रवी राणा व खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी उचलले असून “बोले तैसा चाले,त्याची वंदावी पाऊले”या उक्तीनुसार राणा दाम्पत्याने आपला शब्द सार्थ ठरविला असून त्यानुसार यंदाही १० वी व १२ वीच्या १०८ गुणवंत विद्यार्थ्यांची दिल्लीवारी करिता निवड करण्यात आली आहे.
आज दि.२७ रोजी खासदार नवनीत रवी राणा यांच्या मार्गदर्शनाखाली विदयार्थ्यांना संसद भवन भेट तसेच त्याठिकाणी संपूर्ण संसद भवन, नव्याने उभारण्यात येणाऱ्या सेंट्रल विस्टा या भव्य दिव्य वास्तूचे अवलोकन करून देण्यात येईल तसेच प्रत्यक्षात सभागृहाचे कामकाज कसे चालते याचा अनुभव हे लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीत बसून घेतील.दि.२८ रोजी या विद्यार्थ्यांना राणा दाम्पत्य हे राष्ट्रपती भवन येथे घेवून जातील.या ठिकाणी दरबार हॉल,अशोका गार्डन,मुघल गार्डन आदी दाखविण्यात येईल व तदनंतर दिल्लीतील इंडिया गेट,विजय चौक,लाल किल्ला,तालकटोरा स्टेडियम,गोल मार्केट,पालिका बाजार आदी प्रेक्षणीय स्थळे दाखविण्यात येतील.
सदर कार्यक्रम यशस्वितेकरिता आमदार रवी राणा व खासदार सौ नवनीत रवी राणा यांच्या मार्गदर्शनाखाली युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष जितु दुधाने,महिला शहर अध्यक्षा सुमातीताई ढोके,बडनेरा शहर अध्यक्ष अजय जयस्वाल,अविनाश काळे,नाना आम्ले,अर्चनाताई तालन, शालिनी देवरे,संगीता काळबांडे,चंदा लांडे,लता अंबुलकर,वंदना जामणेकर,बबिता अजबे,मंगेश चव्हाण,राजेश बनारसे,अजय बोबडे,सचिन सोनोने,राजेश सुंदे,वैभव गोस्वामी,रवी वाघमारे,राजेश दात्खोरे,आनंद भोयर सह युवा स्वाभिमानी पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.