Just another WordPress site

ग्रामसेवकास मारहाण करणाऱ्या ग्रा.पं.सदस्यावर गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील कासवा,अकलूद,कठोरा,दुसखेडा या गावांच्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असलेल्या ग्रामसेवकास ग्रा.पं.सदस्याने शिवीगाळ करून मारहाण करीत धमकावल्या प्रकरणी फैजपुर पोलीस ठाण्यात त्या सदस्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की, तालुक्यातील कासवा,अकलूद,कठोरा व दुसखेडा या गावांच्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये प्रविण बळीराम कोळी वय ३८ वर्ष राहणार भुसावळ हे ग्रामसेवक म्हणुन मागील १ वर्षापासुन कार्यरत आहेत.दि.२३ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास प्रविण कोळी हे कासवा ग्रुप ग्रामपंचायतमध्ये आपल्या कार्यालयातील कर्मचारी भगवान पंढरीनाथ कोळी व कारकुन संतोष रामचंद्र सपकाळे यांच्यासोबत कार्यालयीन काम करीत असतांना येथील ग्रा.पं.सदस्य दशरथ अर्जुन सपकाळे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश करून ग्रामसेवक प्रविण कोळी यांना सांगीतले की मला विचारल्याशिवाय तुम्ही कोणतेच ग्रामपंचायतचे काम करायचे नाही असे बोलुन टेबलावरील रजिस्टर बाजुला फेकुन दिले तसेच ग्रामसेवक करीत असलेल्या शासकिय कामात अडथळा आणुन कामकाज बंद पाडले.यावर ग्रामसेवक प्रविण कोळी हे त्यास बोलण्यास गेले असता ग्रामपंचायत सदस्य दशरथ कोळी यांनी शिवीगाळ करीत चापट बुक्यांनी मारहाण करण्यात आली.याबाबत ग्रामसेवक प्रविण कोळी यांनी फैजपुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावरून घटनेशी संबधीत ग्रा.पं.सदस्य दशरथ सपकाळे याच्या विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.