धामणगाव बढे-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
धामणगाव बढे आगामी काळात होऊ घातलेल्या सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गावात पोलिसामार्फत नुकतेच पतसंंचालन करण्यात आले.
गावात जातीय सलोखा तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहावी याकरिता धामणगाव बढे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातून बाजार चौक,मंदिर मस्जिद चौक तसेच गावातील मुख्य ठिकाणाहून पोलिसांच्या वतीने पथसंचालन करण्यात आले.आगामी काळात सर्व समाज बांधवांचे सण व उत्सव हे शांततेत तसेच कुढलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी प्रत्येक समाजातील समाज बांधवांनी घेणे गरजेचे असल्यामुळे कुठलेही सण उत्सव हे चांगल्या रीतीने साजरे करण्यात यावे तसेच कोणताही गैर प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने संपूर्ण गावातून मुख्य मार्गावरून रूट मार्च काढण्यात आला.सदरील पथसंचलनाचा समारोप धामणगाव बढे पोलीस स्टेशन पर्यंत करण्यात आला.